Sourav Ganguly IPL 2024 : तुम बनते नहीं बनाये जाते हो.... सौरव गांगुली पांड्याविरूद्धच्या हूटिंगवर नेमकं काय म्हणाला?

Sourav Ganguly Came In Support In Hardik Pandya
Sourav Ganguly Came In Support In Hardik Pandya esakal

Sourav Ganguly IPL 2024 : आयपीएल 2024 च्या हंगामात मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्याच्या समर्थनात असलेल्या लोकांची संख्या फार कमी आहे. रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवून मुंबईनं हार्दिकला कर्णधार केलं. त्यानंतर नवा कर्णधार हार्दिकला चाहत्यांनी प्रचंड ट्रोल केल. मैदानावर देखील त्याच्याविरूद्ध जोरदार हूटिंग होत आहे.

अशा परिस्थीत भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा माजी अध्यक्ष सौरव गांगुलीने मात्र पांड्याला पाठिंबा दिला आहे. सौरव गांगुली हा असा व्यक्ती आहे जो ट्रिकी प्रश्नांना देखील सडेतोड उत्तर देतो.

गांगुली सध्या दिल्ली कॅपिटल्सचा क्रिकेट संचालक आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या पत्रकार परिषदेत सौरव गांगुलीला हार्दिक पांड्याविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्याने पांड्याची बाजू घेण्याचा प्रयत्न केला.

Sourav Ganguly Came In Support In Hardik Pandya
RR vs RCB IPL 2024 : आरसीबीला जिंकण्यासाठी काय करायला हवं? गावसकरांनी दिला कानमंत्र... फायद्याचा ठरणार?

प्री मॅच प्रेस कॉन्फरन्समध्ये गांगुली म्हणाला की, 'चाहत्यांनी हार्दिक पांड्याविरूद्ध हूटिंग करू नये. हे योग्य नाही. फ्रेंचायजीने त्याला कर्णधार केलं आहे. तुम्ही भारताचा कर्णधार असा किंवा फ्रेंचायजीचा कर्णधार असा तुम्हाला कर्णधार म्हणून नियुक्त केलं जातं.'

गांगुली पुढे म्हणाला की, 'रोहित शर्माचा क्लास वेगळाच आहे. त्याने कर्णधार आणि खेळाडू म्हणून भारतीय संघासाठी आणि त्याच्या फ्रेंचायजीसाठी केलेल्या कामगिरीचा स्तर वेगळाच आहे. हार्दिकला कर्णधार नियुक्त केलं हा काही त्याचा दोष नाही.'

Sourav Ganguly Came In Support In Hardik Pandya
Fact Check: CSK फक्त रोहित शर्मा या एकाच कर्णधाराला घाबरते; खरंच हसी असं म्हणाला? नक्की सत्य काय, जाणून घ्या

मुंबई इंडियन्सने हार्दिकच्या नेतृत्वाखाली सलग तीन सामन्यात पराभव पाहिला आहे. संघाची कामगिरी पाहता हार्दिकच्या अडचणीत वाढच झाली आहे. जरी गांगुलीने पांड्याला आधाराचा खांदा दिला असला तरी तो मुंबईनं दिल्ली कॅपिटल्सविरूद्ध सामना जिंकावा आणि हार्दिकच्या सर्व समस्या संपुष्टात याव्यात अशी प्रार्थना करत नसेल.

(IPL 204 Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com