
VIDEO : केनवरील प्रेमापोटी अंपायरवर बरसले नेटकरी!
पुण्याच्या मैदानातील सलामीच्या लढतीत राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) आपल्या फलंदाजीतील कमाल दाखवली. केन विल्यमसनने टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी फोल ठरवला. सनरायझर्स हैदराबादच्या (Sunrisers Hyderabad) गोलंदाजांची धुलाई करताना राजस्थानने यंदाच्या हंगामातील आतापर्यंतची सर्वाच्च धावसंख्या उभारली. त्यांनी निर्धारित 20 षटकात 6 गड्यांच्या मोबदल्यात 210 धावा कुटल्या. कर्णधार संजू सॅमसनच्या अर्धशतकाशिवाय 55(27) बटलर 35(38), पडिक्कल 41(29) आणि हेटमायर 32(13) धावांची धमाकेदार खेळी केली. धावांचा पाठलाग करताना हैदराबादची सुरुवात खराब झाली. कर्णधार केन विल्यमसन (Kane Williamsons) स्वस्तात माघारी परतला. त्याच्या विकेटवरुन सोशल मीडियावर वादळ उठले आहे.
या धावांचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादची सुरुवात खराब झाली. कर्णधार केन विल्यमसनच्या रुपात त्यांनी पहिली विकेट गमावली. हैदराबादच्या डावातील दुसऱ्या षटकातील चौथ्या चेंडूवर संघाच्या धावफलकावर अवघ्या 3 धावा असताना केन विल्यमसन बाद झाला. प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजीवर संजूच्या हातून झेल निसटला. पण स्लीपमध्ये उभा असलेल्या पड्डीकलने चपळाई दाखवत त्याचे कॅचमध्ये रुपांतरित केले. या कॅचवरुन नेटकऱ्यांनी थर्ड अंपायरवर निशाणा साधला आहे. तिसऱ्या पंचांनी रिप्लाय पाहून केन विल्यमसनला बाद दिले. पण नेटकऱ्यांना केन विल्यमसन नाबाद असल्याचे वाटते.
हेही वाचा: IPL Record : जोस द बॉस; बटलरची विक्रमाला गवसणी
सोशल मीडियावर या कॅचसंदर्भात प्रतिक्रियांची बरसात होत आहे. केन विल्यमसनचा कॅच झालाच नाही, असा सूर उमटताना दिसतोय. अंपायरच्या चुकीच्या निर्णयामुळे तो बाद झाला अशी प्रतिक्रिया एका नेटकऱ्याने दिली आहे. हा निर्णय राजस्थानच्या विजयाचे कारण ठरेल, असा उल्लेखही त्याने केलाय. केन विल्यमसनच्या बॅटची कड घेऊन गेलेला चेंडू आधी संजू सॅमसनच्या ग्लोजवर बाऊन्स झाला. त्यानंतर पड्डीकलने तो झेल टिपण्यापूर्वी जमीनावर आदळला, अशी प्रतिक्रिया एकाने दिली आहे. अनेकजण याचे काही फोटो शेअर करुन केन विल्यमसनवरील प्रेम दाखवून देत आहेत.
हेही वाचा: IPL 2022 : पुण्यातील खास सामन्यात संजूचा क्लास शो!
केन विल्यमसन हा न्यूझीलंडचा असला तरी त्याचा मोठा चाहता वर्ग भारतामध्ये आहे. आयपीएलच्या सामन्यातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय सामन्यावेळीही भारतीय क्रिकेट चाहते केन विल्यमसनवर भरभरुन प्रेम करताना याआधीही पाहायला मिळाले आहे. पुन्हा एकदा याची झलक पाहायला मिळाली.
Web Title: Srh Kane Williamsons Controversial Dismissal Against Rr In Ipl 2022 Netizens Question
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..