VIDEO: तुम्हीच ठरवा कोण भारी? 21 धावा कुटणारा बटलर की वेगवान मारा करणारा मलिक | SRH vs RR Umran Malik bowling Speed | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

SRH vs RR Umran Malik bowling Speed Video

VIDEO: कोण भारी? 21 धावा कुटणारा बटलर की वेगवान मारा करणारा मलिक

पुणे : आयपीएलच्या (IPL 2022) पाचव्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) सनरायझर्स हैदराबाद (SunRisers Hyderabad) विरूद्ध 210 धावा ठोकल्या. या ठोकाठोकीची सुरूवात राजस्थानचा ओपनर जोस बटलरने (Jos Buttler) केली. त्याने पहिले 10 चेंडू निर्धान खेळून काढल्यानंतर उमरान मलिक (Umran Malik) टाकत असलेल्या सामन्यातील चौथ्या षटकात 21 धावा चोपून काढल्या.

हेही वाचा: IPL Record : जोस द बॉस; बटलरची विक्रमाला गवसणी

उमरान मलिकचे हे नुसते स्टॅट पाहिल्यानंतर तुम्ही बटलरने उमरानची पिसे काढली असतील असा आपला ग्रह होण्याची शक्यता आहे. मात्र या षटकाचा व्हिडिओ पाहिला तर उमरान मलिकने जीव तोडून बॉलिंग केल्याचे नक्कीच जाणवते.

जोस बटलरने उमरानच्या पहिल्याच चेंडूवर चौकार मारला. त्याला शॉट कव्हर्सच्या वरून मारायचा होता. मात्र उमरानचा वेग (Umran Malik Bowling Speed) आणि ऑऊट स्विंगमुळे चेंडू पॉईंटच्या डोक्यावरून गेला. अजून थोडी बारीक एज लागली असती तर तो चेंडू थेट थर्ड मॅनच्या हातात विसावला असता.

हेही वाचा: BCCIची तिजोरी ओसंडून वाहणार; IPL प्रसारण हक्कासाठी टेंडर प्रक्रिया सुरू

त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर बटलर स्कूप शॉट खेळण्यासाठी पुढे सरसावला मात्र पुन्हा वेगाने बटलरला भांबावून सोडले. अखेर चेंडू बॅटची कडा घेऊन विकेट किपरच्या डोक्यावरून बाऊंडरी लाईनच्या पार जाऊन पडला. त्यानंतर उमरानने पुढचा चेडू नो बॉल टाकला. मात्र हा चेंडू 150 किमी वेगाने टाकला होता. त्यावर बटलरची एज लागली मात्र स्लिपमधील खेळाडूच्या हाताला लागून तो बाऊंडरी लाईनवर गेला.

त्यानंतरचे तीन चेंडू उमरानने निर्धाव टाकले. मात्र पुन्हा एकदा बटलरने उमराच्या वेगाचा वापर करून षटकार खेचला. जरी उमराच्या या षटकात 21 धावा चोपल्या असल्या तरी त्याच्या या षटकातील वेगाने सर्वांनाच प्रभावित केले.