SRH vs RCB : हसरंगाचा पंजा; RCB चा दणदणीत विजय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sunrisers Hyderabad vs Royal Challengers Bangalore 54th Match

SRH vs RCB : हसरंगाचा पंजा; RCB चा दणदणीत विजय

IPL 2022 : आरसीबीच्या वानिंदू हसरंगाने दमदार गोलंदाजी करत हैदराबादचा निम्मा संघ माघारी धाडला. या जोरावर आरसीबीने हैदराबादचा डाव 125 धावात गुंडाळला. आरसीबीने सामना 67 धावांनी जिंकत 14 गुणांपर्यंत मजल मारली. हैदराबादकडून राहुल त्रिपाठीने झुंजार खेळी करत 38 चेंडूत 48 धावा केल्या. आरसीबीने कर्णधार फाफ ड्युप्लेसिसच्या नाबाद 73, दिनेश कार्तिकच्या 8 चेंडूत केलेल्या नाबाद 30 धावांच्या जोरावर 20 षटकात 3 बाद 192 धावांपर्यंत मजल मारली.

पाहा हायलाईट्स

हसरंगाची दमदार गोलंदाजी ; आरसीबाचा दणदणीत विजय

वानिंदू हसरंगाने भेदक मारा करत हैदराबादच्या पाच फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये धाडले. त्याने 18 धावात 5 बळी टिपले. त्याच्या माऱ्यासमोर एकही हैदराबादचा फलंदाज टिकाव धरू शकला नाही. अखेर हैदराबादचा डाव 125 धावात संपुष्टात आला.

89-4 : निकोलस पूरन 19 धावांची खेळी करून माघारी

51-3 : डाव सावरणाऱ्या माक्ररमची हसरंगाने केली शिकार

वानिंदू हसगंगाने माक्ररमला 21 धांवांवर बाद करत हैदराबादला तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करून देणारी जोडी फोडली.

1-2 हैदराबादला पहिल्याच षटकात दुसरा धक्का

केन विल्यमसन पाठोपाठ हैदराबादचा दुसरा सलामीवीर अभिषेक शर्मा देखील माघारी परतला. त्याचा मॅक्सवेलने शुन्यावर त्रिफळा उडवला.

0-1 केन विल्यमसन पहिल्याच चेंडूवर धावबाद

दिनेश कार्तिकच्या 8 चेंडूत धडाकेबाज 30 धावा

दिनेश कार्तिकने 8 चेंडूत 30 धावा चोपत आरसीबीला 192 धावांपर्यंत नेला. कर्णधार फाफ ड्युप्लेसिसने 50 चेंडूत नाबाद 73 धावा केल्या.

159-3 : ग्लेन मॅक्सवेल बाद 

  • 105/2 - RCBला दुसरा धक्का, रजत पाटीदार 47 वर आउट

    पाटीदारने 38 चेंडूंत 4 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 48 धावा केल्यानंतर सुचिथच्या चेंडूवर राहुल त्रिपाठीकडे झेलबाद झाला.

  • फाफ डू प्लेसिसचे अर्धशतक

    फाफ डू प्लेसिसने 34 चेंडूंत 6 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने अर्धशतक केले. विराट खाते न उघडताच बाद झाल्यानंतर कर्णधार डू प्लेसिसच्या खांद्यावर मोठी जबाबदारी आल्याने हे अर्धशतक अत्यंत निर्णायक वेळी आले आहे.

  • 47/1 - पॉवरप्लेमध्ये बंगळुरूच्या 47 धावा

    डावाच्या पहिल्याच चेंडूवर विराट कोहली बाद झाला. त्याचा संघावर काही परिणाम झाला नाही. रजत पाटीदार आणि कर्णधार फाफ डू प्लेसिस यांनी डाव सावरत. पॉवरप्लेमध्ये बंगळुरूने एका विकेटच्या मोबदल्यात 47 धावा केल्या आहेत.

  • 0/1 - सुचितच्या पहिल्याच चेंडूवर विराट कोहली पुन्हा एकदा गोल्डन डकचा बळी

    विराट कोहलीने पुन्हा एकदा त्याच्या चाहत्यांची निराशा केली आहे. सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर विराट बाद झाला. आयपीएल 2022 मधील हे त्याचे तिसरे गोल्डन डक आहे.

  • रॉयल चैलेंजर्स बैंगलोर प्लेइंग इलेवन

    विराट कोहली, फाफ डुप्लेसी (कप्तान), रजत पाटीदार, ग्लेन मैक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), शाहबाज अहमद, वनिन्दु हसरंगा, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज और जोश हेजलवुड

  • सनराइजर्स हैदराबाद प्लेइंग इलेवन

    अभिषेक शर्मा, केन विलियमसन (कप्तान), राहुल त्रिपाठी, एडेन मार्कराम, निकोलस पूरन (विकेटकीपर), शशांक सिंह, जगदीश सुचिथ, कार्तिक त्यागी, भुवनेश्वर कुमार, फजलहक फारूकी और उमरान मलिक