esakal | अभिमानास्पद! 'टीम इंडिया'च्या जर्सीला 'बुर्ज खलिफा'वर स्थान | Team India Jersey
sakal

बोलून बातमी शोधा

Team-India-Jersey-Burj-Khalifa

टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची नवी जर्सी

अभिमानास्पद! 'टीम इंडिया'च्या जर्सीला 'बुर्ज खलिफा'वर स्थान

sakal_logo
By
विराज भागवत

T20 World Cup 2021 स्पर्धेला १७ ऑक्टोबरपासून सुरूवात होणार आहे. युएईमध्ये आता IPL च्या शेवटच्या टप्प्यातील सामने सुरू आहेत. हे सामने संपल्यानंतर विश्वचषकाच्या सामन्यांना सुरूवात होणार आहे. यंदाच्या T20 विश्वचषकाचे यजमानपद भारताकडे आहे. पण असे असले तरी कोरोनाच्या भीतीपोटी ही स्पर्धा भारताबाहेर युएई आणि ओमानमध्ये खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी टीम इंडियाच्या खास नव्या जर्सीचे ट्विटरवरून अनावरण करण्यात आले. भारतीय संघाची जर्सी आज फोटोच्या रूपाने दाखवण्यात आली. भारतीय संघातील काही खेळाडूंचा नव्या जर्सीतील एक फोटो BCCI ने पोस्ट केला. त्यानंतर आज चक्क दुबईच्या बुर्ज खलिफा या उंच इमारतीवर भारताची जर्सी दाखवण्यात आली. बुर्ज खलिफावर एखादी गोष्ट दिसणे हा अभिमानाचा क्षण असतो. त्यामुळेच, बुर्ज खलिफावर टीम इंडियाची जर्सी दिसणं हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद आहे.

पाहा Video:

भारताचे विश्वचषक स्पर्धेतील सामने-

१८ ऑक्टोबर - भारत वि. ऑस्ट्रेलिया (सराव सामना)

२० ऑक्टोबर - भारत वि. इंग्लंड (सराव सामना)

२४ ऑक्टोबर - भारत वि. पाकिस्तान (सुपर १२)

३१ ऑक्टोबर - भारत वि. न्यूझीलंड (सुपर १२)

३ नोव्हेंबर - भारत वि. अफगाणिस्तान (सुपर १२)

५ नोव्हेंबर आणि ८ नोव्हेंबर या दोन दिवशीचे सामने पात्रता फेरीतील संघांशी होणार आहे.

loading image
go to top