MI vs CSK IPL 2023 : मुंबईचे महान खेळाडू कच खात असताना युवा पिढीने वाचवली लाज

MI vs CSK IPL 2023
MI vs CSK IPL 2023esakal

MI vs CSK IPL 2023 : मुंबईचे महान फलंदाज एका पाठोपाठ एक पॅव्हेलियनच्या वाटेवर जात असताना तिलक वर्मा (22), टीम डेव्हिड (31) आणि ऋतिक शौकीन (18) यांनी संघाची लाज वाचवली. मुंबईची अवस्था 7 बाद 113 धावा अशी झाली होती. तरी मुंबईने 20 षटकात 157 धावांपर्यंत मजल मारली. चेन्नईकडून रविंद्र जडेजाने 3 तर मिचेल सँटरन आणि तुषार देशपांडेने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

MI vs CSK IPL 2023
MI vs CSK IPL 2023 Live : डेव्हिड अन् शौकीनने मुंबईला पोहचवले 150 पार

चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध मुंबई इंडियन्स या हाय व्होल्टंज सामन्यात मुंबईच्या होम ग्राऊंडवर चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्विकारली. मुंबईचे सलामीवीर रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी 4 षटकात 38 धावा करत चांगली सुरूवात करून देण्याचा प्रयत्न केला.

मात्र तुषार देशपांडेने मुंबईच्या मनसुब्यांवर पाणी फेरले. त्याने रोहितचा 21 धावांवर त्रिफला उडवला. यानंतर इशान किशन आणि ग्रीन यांनी डाव सावरत संघाला 64 धावांपर्यंत मजल मारून दिली. मात्र रविंद्र जडेजाने इशान किशनला 32 धावांवर बाद करत मुंबईचा सेट झालेला फलंदाज माघारी धाडला. पाठोपाठ सूर्यकुमार यादव देखील सँटनरच्या गोलंदाजीवर 1 धावेची भर घालून परतला.

या पडझडीनंतर ग्रीन आणि तिलक वर्मा यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र रविंद्र जडेजाने ग्रीनला 12 तर सँटनरने अर्शद खानला 2 धावांवर बाद करत मुंबईची अवस्था 9.1 षटकात 5 बाद 76 धावा अशी केली.

MI vs CSK IPL 2023
Suryakumar Yadav IPL : होम ग्राऊंडवर देखील सूर्या निस्तेज! अवघ्या दोन चेंडूत गुंडाळला गाशा

यानंतर गेल्या सामन्यात 82 धावांची खेळी करत मुंबईची लाज वाचवलेल्या तिलक वर्माने 18 चेंडूत 22 धावा करत सेट होण्याचा प्रयत्न केला. मात्र जडेजाने त्याला बाद करत मुंबईला सहावा धक्का दिला. तिलक बाद झाल्यानंतर टीम डेव्हिडने 22 चेंडूत 31 धावा केल्या. त्यानंतर ऋतिक शौकीनने 13 चेंडूत 18 धावा करत मुंबईला 20 षटकात 8 बाद 157 धावांपर्यंत पोहचवले.

(Sports Latest News)

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com