Arjun Tendulkar IPL 2023 : MI मध्ये अर्जुन हा 'अतिरिक्त' गोलंदाजच! माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूचे कठोर वक्तव्य

Arjun Tendulkar IPL 2023
Arjun Tendulkar IPL 2023 esakal

Arjun Tendulkar IPL 2023 : यंदाच्या आयपीएल हंगामात मुंबईचा कर्णधार रोहित शर्मापेक्षाही पदार्पण करणारा अर्जुन तेंडुलकर जास्त चर्चेत राहिला आहे. सचिन तेंडुलकरचा मुलगा म्हणून अर्जुनच्या प्रत्येक गोष्टीवर अख्या जगाचे लक्ष असते. अर्जुनने अशी गोलंदाजी केली, अर्जुनची पहिली विकेट... अर्जुनचा पहिला सिक्सर... इत्यादी इत्यादी! मात्र अर्जुन तेंडुलकरने दोन - चार आयपीएल सामन्यात केलेल्या कामगिरीवरून ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू आणि समालोचक टॉम मूडी यांनी एक कठोर वक्तव्य केलं आहे.

Arjun Tendulkar IPL 2023
Jio Cinema : फ्री IPL दाखवली आता जिओ सिनेमाचे सबस्क्रिप्शन प्लॅन्स झाले लीक! दोन रूपयांपासून होणार सुरूवात

आयपीएलच्या 35 व्या सामन्यात गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सचा 55 धावांनी पराभव केला. या सामन्यात गुजरातने मुंबईच्या गोलंदाजांना ठोकून काढत 206 धावा उभारल्या होत्या. या सामन्यात अर्जुन तेंडुलकरच्या नशिबात फक्त 2 षटकेच आली. आतापर्यंत खेळलेल्या आयपीएलमधील सामन्यापैकी एक सामना सोडला तर अर्जुन तेंडुलकरने आपला 4 षटकांचा कोटा कधीही पूर्ण केलेला नाही. हीच बाब लक्षात आणून देत टॉम मूडी यांनी ईएसपीएल क्रिकइन्फोशी बोलताना एक मोठे वक्तव्य केले.

मूडी म्हणाले की, 'अर्जुन तेंडुलकरला तिसरे षटक टाकण्याची संधी मिळेल अशी शाश्वती देऊ शकत नाही. जर तुम्ही सर्वोत्तम गोलंदाज असता, सर्वात अनुभवी गोलंदाज असता त्यावेळी जास्त लालची होऊन विचार करता की मला अजून एक अतिरिक्त षटक कसे टाकता येईल.' गुजरातविरूद्ध मेरेडिथ आणि ग्रीन मार खात असताना अर्जुनला गोलंदाजी न देण्याच्या निर्णयाचे मूडी यांनी समर्थन केले.

Arjun Tendulkar IPL 2023
Rishabh Pant : अपघातानंतर पंत पहिल्यांदाच NCAमध्ये, चाहत्यांना लागली उत्सुकता किती दिवसात परतणार?

ते पुढे म्हणाले की, 'अर्जुन तेंडुलकरने त्याचे काम केले. तो एक बदली खेळाडू आहे. तो एक अतिरिक्त गोलंदाज आहे. एका अतिरिक्त गोलंदाजाला 4 षटकांचा पूर्ण कोटा मिळत नाही. तो पॉवर प्लेमध्ये चांगले योगदान देत आहे. तो विकेट्स घेत आहे. गाई घरी परत आल्यावर तुम्ही त्यावर वाद घालू शकत नाही. तुम्ही अर्जुनने ग्रीनच्या ऐवजी डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजी करायला हवी होती असं म्हणू शकत नाही. ग्रीन हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील गोलंदाज आहे. त्याने खराब गोलंदाजी केली.'

(Sports Latest News)

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com