Travis Head SRH vs MI : पहिल्याच सामन्यातच हेडचा धडाका; हैदराबादच्या इतिहासात झाला नाही असा पॉवर प्ले!

Travis Head
Travis Head esakal
Updated on

Travis Head Fastest Half Century For SRH vs MI : भारतात झालेल्या वनडे वर्ल्डकप फायनलमध्ये शतकी खेळी करणाऱ्या ट्रॅविस हेडने सनराईजर्स हैदराबादकडून आपल्या आयपीएल कारकिर्दीची देखील धडाक्यात सुरूवात केली. त्याने हैदराबादकडून सर्वात वेगवान अर्धशतक ठोकले. हेडने 18 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. याचबरोबर हैदराबादला आपल्या आयपीएल इतिहासात जे आतापर्यंत जमलं नाही ती कामगिरी करून देण्यात मोलाचं योगदान दिले.

Travis Head
IPL 2024 SRH vs MI : सामन्यात तब्बल 523 धावा! हैदराबादने मुंबईचा केला 31 धावांनी पराभव

सनराईजर्स हैदराबादने आतापर्यंत आयपीएल इतिहासात पॉवर प्लेमध्ये 80 धावांचा टप्पा पार केला नव्हता. अखेर ट्रॅविस हेड आणि अभिषेक शर्मा या जोडीने पॉवर प्लेमध्ये 1 बाद 81 धावा ठोकत हैदराबादला आयपीएल इतिहालातील पॉवर प्लेमधील सर्वाधिक स्कोअर उभा करून दिला.

Highest Powerplay scores for SRH
81/1 vs MI, Hyderabad, 2024
79/0 vs KKR, Hyderabad, 2017
77/0 vs PBKS, Hyderabad, 2019
77/0 vs DC, Dubai, 2020

हेडने अर्धशतकानंतर देखील दम घेतला नाही. त्याने आपली तडाखेबाज फलंदाजी कायम ठेवली. त्याने सातव्या षटकता हैदराबादचे शतक धावफलकावर लावले.

ट्रॅविस हेडने पॉवर प्लेमध्ये देखील धडाकेबाज फलंदाजी करत SRH साठी दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च खेळी केली.

IPL मध्ये SRH साठी PP मध्ये सर्वोच्च स्कोअर

डेव्हिड वॉर्नर 62*(25) - विरुद्ध केकेआर, हैदराबाद, 2019

ट्रॅव्हिस हेड 59*(20) - विरुद्ध एमआय, हैदराबाद, 2024

डेव्हिड वॉर्नर 59*(23) - विरुद्ध CSK, हैदराबाद, 2015

डेव्हिड वॉर्नर 56*(26) - विरुद्ध CSK, रांची, 2014

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com