Team India : टीम इंडियाला मोठा धक्का! जसप्रीत बुमराहनंतर आता हा अनुभवी गोलंदाज दुखापतीमुळे बाहेर?

 
umesh yadav suffers hamstring injury ahead
umesh yadav suffers hamstring injury ahead

Umesh Yadav Injury : भारतामध्ये आता सध्या आयपीएलचा धुमधडाका सुरू आहे. आयपीएल नंतर भारतीय क्रिकेट संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी तयारीला लागणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 7 जूनपासून ओव्हलवर खेळल्या जाणार आहे. या सामन्यात टीम इंडियासमोर ऑस्ट्रेलियाचे आव्हान असेल.

मात्र, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज उमेश यादव हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीशी झुंजत आहे. उमेश यादवला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमधून बाहेर पडावे लागू शकते, असे मानले जात आहे. असे झाल्यास टीम इंडियासाठी हा मोठा धक्का ठरू शकतो.

 
umesh yadav suffers hamstring injury ahead
Cheteshwar Pujara : ऑस्ट्रेलियासाठी धोक्याची घंटा वाजवली! WTC फायनलपूर्वी पुजाराने पुन्हा ठोकले शतक

आयपीएल 2023 हंगामात उमेश यादव कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळत आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या सामन्यात उमेश यादवला दुखापत झाली. त्यानंतर उमेश यादवला गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात बाहेर बसावे लागले. उमेश यादव आयपीएल 2023च्या आगामी सामन्यांमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळेल की नाही, हे सध्या स्पष्ट झालेले नाही. मात्र तो दुखापतीतून सावरला तर तो कोलकाता नाइट रायडर्सच्या जर्सीत दिसू शकतो.

 
umesh yadav suffers hamstring injury ahead
Yuzvendra Chahal : रोहितच्या बर्थ डे पार्टीत युजवेंद्र चहल टल्ली? अडखळत चालतानाचा 'तो' Video Viral

उमेश यादवची दुखापत ही भारतीय संघ व्यवस्थापनासाठी चांगली बातमी नाही, कारण हा संघ आधीच अनेक खेळाडूंच्या दुखापतींशी झुंजत आहे. भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहशिवाय श्रेयस अय्यरसारखा खेळाडू दुखापतीमुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये खेळू शकणार नाही.

सध्या भारतीय संघ व्यवस्थापन या दुखापतींच्या जागी बदली खेळाडूंच्या पर्यायांचा विचार करत आहे, मात्र उमेश यादवची दुखापत ही डोकेदुखी वाढवणारी बातमी आहे. विशेष म्हणजे वर्ल्ड कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना ७ जूनपासून ओव्हलवर खेळवला जाणार आहे. टीम इंडियाने सलग दुस-यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com