esakal | Video: पोलार्डचा 'रॉकेट-शॉट' जेसन रॉयच्या हातात जाणारच होता, इतक्यात... | Pollard
sakal

बोलून बातमी शोधा

Video: पोलार्डचा 'रॉकेट-शॉट' रॉयच्या हातात जाणार इतक्यात...

पोलार्डने स्पिनरचा टप्प्यात मिळालेला चेंडू जोरात मारला

Video: पोलार्डचा 'रॉकेट-शॉट' रॉयच्या हातात जाणार इतक्यात...

sakal_logo
By
विराज भागवत

IPL 2021 MI vs SRH Video: मुंबई इंडियन्सच्या संघाने IPLच्या इतिहासातील आपली सर्वात उच्चांकी धावसंख्या गाठत SRHला २३६ धावांचे आव्हान दिले. मुंबईचे दोन तरणेबांड खेळाडू इशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांनी संघाला तडाखेबाज द्विशतकी मजल मारून देण्यात मोलाचा वाटा उचलला. इशान किशनने ३२ चेंडूत ८४ धावा कुटल्या. तर सूर्यकुमारने ४० चेंडू ८२ धावांची खेळी केली. या सामन्यात कायरन पोलार्डकडून संघाला मोठी अपेक्षा होती. त्यानुसार त्याने सुरूवातही केली होती. पण जेसन रॉयने त्याचा अप्रतिम झेल टिपला.

हेही वाचा: इशान किशनचा झंजावात! केला रोहित, विराटलाही न जमलेला पराक्रम

कायरन पोलार्ड हार्दिक पांड्या बाद झाल्यावर मैदानात आला. त्याने सावध सुरूवात केली होती. पहिल्या ११ चेंडूमध्ये त्याने केवळ एकच चौकार लगावला. १२व्या चेंडूवर त्याने षटकार मारण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा फटका हवा तितका उंच गेला नाही. सीमारेषेवर असलेला जेसन रॉय चेंडू पाहून धावत आला. झेल टिपण्याचा प्रयत्न करत असताना त्याच्याकडून थोडीशी गडबड झाली पण त्याने अखेर तो झेल टिपलाच.

पाहा व्हिडीओ-

हेही वाचा: Video: (इ) शानदार !!! किशनने SRH ला दणका देत कुटल्या ८४ धावा

दरम्यान, रोहित शर्माने नाणेफेक जिंकत फलंदाजी घेतली. रोहित (१८), हार्दिक पांड्या (१०) आणि पोलार्ड (१३) यांनी निराशा केली. पण इशान किशनने तुफान फटकेबाजी केली. त्याने ११ चौकार आणि ४ षटकार खेचत ३२ चेंडूत ८४ धावा केल्या. तो बाद झाल्यावर सूर्यकुमार यादवने डाव सांभाळला. जिमी नीशम (०), कृणाल पांड्या (९), नॅथन कुल्टर नाईल (३), पियुष चावला (०) या साऱ्यांनी केवळ मैदानावर हजेरी लावली आणि लगेच माघारी परतले. सूर्याने मात्र ४० चेंडूत १३ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ८२ धावा केल्या. या दोघांच्या फटकेबाजीच्या जोरावरच मुंबईने हैदराबादला २३६ धावांचे भले मोठे आव्हान दिले.

loading image
go to top