esakal | Video: धोनी स्टाईलमध्ये विषय END! पाहा MS चा विजयी सिक्सर... | MS Dhoni Six
sakal

बोलून बातमी शोधा

Video: धोनी स्टाईलमध्ये विषय END! पाहा MS चा विजयी सिक्सर...

शेवटच्या ओव्हरमध्ये धोनीने दाखवला जलवा

Video: धोनी स्टाईलमध्ये विषय END! पाहा MS चा विजयी सिक्सर...

sakal_logo
By
विराज भागवत

IPL 2021 CSK vs SRH: महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सने सनरायझर्स हैदराबादचा ६ गडी राखून पराभव केला आणि दिमाखात प्ले-ऑफ्स फेरीत प्रवेश केला. वृद्धिमान साहाच्या ४४ धावांच्या जोरावर हैदराबादने २० षटकात १३४ धावा केल्या होत्या. ऋतुराज गायकवाड (४५) आणि फाफ डु प्लेसिस (४१) यांच्या दमदार खेळीच्या जोरावर चेन्नईने २ चेंडू राखून १३५ धावांचे माफक आव्हान पार केले. महत्त्वाची बाब म्हणजे, या सामन्याचा विजयी षटकार खुद्द महेंद्रसिंग धोनीने लगावला. धोनीच्या या षटकाराची चांगलीच चर्चा रंगली.

पाहा धोनीचा तो विजयी षटकार-

दरम्यान, चेन्नईने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा पर्याय स्वीकारला होता. धोनीचा हा निर्णय त्याच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. गोलंदाजीच्या गतीत सातत्याने बदल करत त्यांनी गोलंदाजी केली. त्यामुळे हैदराबादच्या वृद्धिमान साहाला (४४) वगळता इतर कोणीही फार काळ खेळपट्टीवर टिकू शकला नाही. जेसन रॉय (२), केन विल्यमसन (११), प्रियम गर्ग (७), अभिषेक शर्मा (१८), अब्दुल समद (१८) आणि जेसन होल्डर (५) या साऱ्यांनीच चाहत्यांची निराशा केली. चेन्नईकडून हेजलवूडने सर्वाधिक ३ बळी टिपले.

१३५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईचे सलामीवीर ऋतुराज गायकवाड (४५) आणि फाफ डु प्लेसिस (४१) यांनी शतकी सलामी दिली. पण त्यानंतर दोन्ही सलामीवीर आणि पाठोपाठ मोईन अली (१७), सुरेश रैना (२) झटपट बाद झाल्याने सामन्यात रंगत आली. जेसन होल्डरने काही काळासाठी सामना हैदराबादकडे झुकवण्याचा प्रयत्न केला. पण अखेर धोनीने उत्तुंग षटकार खेचत संघाला विजय मिळवून दिला.

loading image
go to top