esakal | Video: भारताच्या कन्येचा ऑस्ट्रेलियात डंका; लांबूनच उडवला स्टंप | Shafali Verma
sakal

बोलून बातमी शोधा

Shafali-Throw

सिडनी सिक्सर्सकडून खेळताना केली दमदार कामगिरी

Video: भारताच्या कन्येचा ऑस्ट्रेलियात डंका; लांबूनच उडवला स्टंप

sakal_logo
By
विराज भागवत

Shafali Verma in WBBL 2021: भारतीय खेळाडूंना IPL वगळता इतर देशांच्या टी२० लीग स्पर्धांमध्ये खेळण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र, भारताच्या महिला क्रिकेटपटूंना ऑस्ट्रेलियात रंगणाऱ्या वुमन्स बीग बॅश लीग स्पर्धेत खेळण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे यंदाच्या वुमन्स बीग बॅश लीग स्पर्धेत भारताकडून एकूण ८ महिला खेळाडूंना विविध संघातून करारबद्ध करण्यात आले आहे. WBBL 2021 चा आज पहिला सामना पार पडला. सिडनी सिक्सर्स विरूद्ध मेलबर्न स्टार्स असा सामना रंगला होता. त्या सामन्यात भारताची कन्या शफाली वर्मा हिने केलेल्या डायरेक्ट हिटची चांगलीच चर्चा रंगली.

हेही वाचा: 'ग्लॅमरस IPL' ... मॅचपेक्षाही 'या' तरूणींच्या अदांचीच चर्चा!

मेलबर्न स्टार्स संघाच्या फलंदाज प्रथम फलंदाजीसाठी आल्या. एलिस विलानी आणि अनाबेल सदरलँड या दोघींनी दमदार सुरूवात करत ४९ धावांची भागीदारी केली. त्यांची अर्धशतकी भागीदारी होण्याआधीच शफाली वर्माने अप्रतिम थ्रो करत संघाला एकमेव यश मिळवून दिलं. सदरलँड धाव घेत असताना शफालीने लांबूनच स्टंपचा वेध घेतला आणि तिला धावचीत करत माघारी पाठवलं.

पाहा शफालीच्या थ्रो चा व्हिडीओ-

हेही वाचा: Video: युवा शिवम मावीने उडवला अनुभवी स्टॉयनीसचा त्रिफळा

सामन्यात काय घडलं?

मेलबर्न स्टार्स संघाने प्रथम फलंदाजी करताना ११ षटकात १ बाद ९९ धावा केल्या. एलिस विलानीने नाबाद अर्धशतक (५४) केलं. मेग लॅनिंगने २३ धावांची खेळी करत तिला उत्तम साथ दिली. १०० धावांचे आव्हान सिडनी सिक्सर्स संघाने शेवटच्या षटकात पूर्ण केले. एलिसा हेलीने ५७ धावांची दमदार खेळी केली. इतर खेळाडूंना दोन आकडी धावसंख्या गाठता आली नाही, पण त्यांच्या सांघिक कामगिरीच्या जोरावर सिडनी सामना मात्र जिंकला.

loading image
go to top