esakal | Video: वेगवान रबाडाला डी कॉकने हाणला अजब गजब सिक्सर! | IPL 2021
sakal

बोलून बातमी शोधा

De-Kock-Six-Rabada

वेगाने आलेला चेंडू पाहून तो स्टंप झाकू लागला अन्...

Video: वेगवान रबाडाला डी कॉकने हाणला अजब गजब सिक्सर!

sakal_logo
By
विराज भागवत

IPL 2021 Video: मुंबई इंडियन्सविरूद्धच्या सामन्यात दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीचा संघ आधीच 'प्ले-ऑफ्स'मध्ये पोहोचला आहे पण मुंबईला विजय आवश्यक आहे. अशा वेळी मुंबईला दमदार फलंदाजीची अपेक्षा होती. कर्णधार रोहित शर्मा अतिशय स्वस्तात बाद झाला. आवेश खानने त्याला ७ धावांवर माघारी धाडले. त्यानंतर क्विंटन डी कॉकने फटकेबाजीला सुरूवात केली. वेगवान कगिसो रबाडाने टाकलेला चेंडू क्विंटन डी कॉकने दिमाखात सीमारेषेबाहेर पाठवला.

क्विंटन डी कॉकने १८ चेंडूत १९ धावा केल्या आणि तो अक्षर पटेलच्या षटकात बाद झाला. सूर्यकुमार यादवने तडाखेबाज सुरुवात केली होती. त्याने २६ चेंडूत ३३ धावा केल्या. सौरभ तिवारीने १५ धावा करत सुरूवात केली होती. पण या दोघांनाही अक्षर पटेलने माघारी पाठवले. हार्दिक पांड्या आणि कायरन पोलार्ड या जोडीकडून मुंबईच्या चाहत्यांना फटकेबाजीची अपेक्षा होती. पण पोलार्डने पुन्हा निराशा केली. इतर खेळाडूंनाही मोठी धावसंख्या उभारता आला नाही.

loading image
go to top