
इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 जिंकणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) च्या विजयोत्सवाला बंगळुरूतील चिन्नास्वामी स्टेडियमजवळ मंगळवारी रक्तरंजित वळण लागलं. विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी स्टेडियमबाहेर जमलेल्या हजारो चाहत्यांमध्ये अचानक चेंगराचेंगरी झाली. ज्यामुळे ११ जणांचा मृत्यू झाला आणि ३३ जण गंभीर जखमी झाले. या घटनेने संपूर्ण शहर हादरलं असून, सोशल मीडियावर #ArrestKohli हा हॅशटॅग ट्रेंड करत आहे.