Video: मॅक्सवेलच्या पार्टीत कोहली झाला 'पुष्पा' | Virat Kohli Dance on Pushpa Song | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Virat Kohli dance on Pushpa song o antava

Video Viral: मॅक्सवेलच्या पार्टीत कोहली झाला 'पुष्पा'

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्टार खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने (Glenn Maxwell) नुकतेच लग्न केले आहे. लग्नानंतर मॅक्सवेलनी पार्टी आयोजित केली होती. यामध्ये विराट कोहली (virat kohli), अनुष्का शर्मा, शाहबाज अहमद यांच्यासह टीमचे अनेक स्टार खेळाडू उपस्थित होते. माजी कर्णधार कोहली पार्टीत धमाल करताना दिसला. कोहली आणि शाहबाजचा पार्टीला डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. चाहत्यांना कोहलीचा डान्स आवडताना दिसत आहे. (Virat Kohli dance Pushpa song 'O Antava')

मॅक्सवेलने लग्न भारतीय वंशाची विनी रमनशी (Vini Raman) केले आहे. त्यांचा विवाह भारतीय परंपरेनुसार पार पडला. या दोघांच्या लग्नापूर्वी बरीच चर्चा रंगली होती. मॅक्सवेल लग्नामुळे आयपीएलचे 2022 पहिले काही सामने खेळू शकला नाही. यानंतर त्यांनी नुकतीच पार्टी दिली. यामध्ये कोहलीने या पार्टीत जबरदस्त डान्स केला. कोहलीसोबत त्याची पत्नी अनुष्का शर्मा ही पार्टीत इतर खेळाडू सोबत दिसले.