पत्नी अनुष्का शर्मासोबत विराट कोहली पोहोचला जिममध्ये -Video Viral | Virat Kohli Gym With Anushka Sharma | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Virat Kohli Gym With Anushka Sharma

पत्नी अनुष्का शर्मासोबत विराट कोहली पोहोचला जिममध्ये -Video Viral

भारताचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहलीची (Virat Kohli) फिटनेसची आवड सगळ्यांचा माहितीच आहे. विराट मैदानावर धावा करत असो किंवा नसो, तो सामन्याच्या तयारीत 100 टक्के देण्यास कधीच चुकत नाही. मैदानावर क्रिकेटचा सराव करण्यासोबतच तो शारीरिक ताकद सुदृढ ठेवण्यासाठी जिममध्ये अधिक सराव करतो असतो. विराट कोहलीने मंगळवारी संध्याकाळी सोशल मीडिया स्वतःचा एक व्हिडिओ पोस्ट केला. व्हिडिओमध्ये विराटसोबत त्याची पत्नी अनुष्का शर्माही जिममध्ये घाम गाळताण दिसत आहे. विराटने या क्षणाला अप्रतिम कॅप्शन देत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 'बॅक टू माय फेव्हरेट विथ माय फेव्हरेट' अनुष्का शर्माला टॅग करत त्याने हृदयाचा इमोजीही टाकला आहे.(Virat Kohli Gym With Anushka Sharma)

T-20 आंतरराष्ट्रीय आणि कसोटी संघाचे कर्णधारपद सोडलेला विराट कोहली यावेळी आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) कडून खेळत आहे. यावेळी तो या हंगामामध्येही कर्णधारपदाशिवाय खेळत आहे. कारण टी-20 विश्वचषक सुरू होण्यापूर्वीच त्याने आधी टीम इंडियाची कमान आणि नंतर आरसीबीची कमान सोडण्याची घोषणा केली होती.

विराट कोहलीसाठी हा हंगामा काही खास राहिला नाही. त्याने आतापर्यंत खेळलेल्या 10 सामन्यातमध्ये त्याला फक्त एकच अर्धशतक करता आले आहे, तर त्याच्या नावावर एकूण 186 धावा आहेत. या स्पर्धेत विराटने आतापर्यंत 20.67 च्या सरासरीने धावा केल्या आहेत.

Web Title: Virat Kohli Doing Gym Session With Anushka Sharma Watch Video

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top