'कोहलीचा रेकॉर्ड नाही तर स्वप्न मोडू शकतो' चाहत्यांनी शेअर केले मीम्स

बटलरच्या शतकाच्या जोरावर राजस्थानने आरसीबीचा पराभव करत अंतिम फेरीचे तिकीट केले निश्चित
virat kohli jos buttler century
virat kohli jos buttler century

jos buttler century: आयपीएल क्वालिफायर सामन्यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले. क्वालिफायर सामन्यात राजस्थान रॉयल्सने आरसीबीचा 7 गडी राखून पराभव केला. राजस्थान रॉयल्ससाठी जोस बटलर विजयाचा हिरो ठरला. करा किंवा मरोच्या सामन्यात आरसीबीच्या गोलंदाजांविरुद्ध बटलरने तुफानी फलंदाजी करत शतक केलं. बटलरच्या शतकाच्या जोरावर राजस्थानने आरसीबीचा पराभव करत अंतिम फेरीचे तिकीट निश्चित केले.

राजस्थानच्या विजयाची जबाबदारी पुन्हा एकदा या सामन्यात बटलरने घेतली. राजस्थानला जवळपास एकहाती सामना जिंकून दिला. खेळीदरम्यान बटलरने 176 च्या स्ट्राइकरेटने 60 चेंडूत 10 चौकार आणि 6 षटकारांसह 106 धावा केल्या. जोस बटलर ची धमाकेदार खेळी पाहून चाहते पुन्हा एकदा त्याच्या प्रेमात पडले. त्याच्या कौतुकात मजेदार मीम्स शेअर करत आहेत.

RCB विरुद्ध शतक झळकावून जोस बटलरने या हंगामातील चौथे शतक ठोकत राजस्थानला फायनलमध्ये पोहचवले. विराट कोहलीच्या शतकी विक्रमाची बरोबरी केली. जर या इंग्लिश फलंदाजाने गुजरात टायटन्सविरुद्धच्या अंतिम सामन्यातही शतक झळकावले. तर तो विराट कोहलीच्या सर्वाधिक धावाचा विक्रम मोडू शकतो. मात्र, आता विराटचा विक्रम मोडणे बटलरला अशक्य होणार आहे.

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर राजस्थान रॉयल्सच्या जॉस बटलरने रॉयल चॅलेंजर बेंगलोरचे 158 धावांचे आव्हान पार करताना हंगामातील आपले चौथे शतक ठोकत राजस्थानला फायनलमध्ये पोहचवले. राजस्थानने बेंगलोरचे 158 धावांचे आव्हान 18.1 षटकात 3 फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. बटलरने 60 चेंडूत 106 धावा ठोकल्या. राजस्थानने सामना 7 विकेट राखून जिंकत आयपीएल 2022 ची फायनल गाठली. आता राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात रविवारी फायनल सामना होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com