IPL 2020 मध्ये कोहलीबरोबर झालेलं भांडण: सूर्यकुमार यादवने दिलं उत्तर...

2020 मध्ये त्याने विराट कोहलीसोबत मैदानात झालेल्या वादाचा केला खुलासा
virat kohli AND suryakumar yadav
virat kohli AND suryakumar yadavSAKAL

IPL 2022: इंडियन प्रीमियर लीगमध्ये 15 व्या सीझनची उत्सुकता वाढत चालले आहे. या हंगामातील 31 वा सामना पार पडल्यानंतर, गुजरातचा संघ 10 गुणांसह (+0.395) पहिल्या स्थानावर आहे. आयपीएलमधील सर्वात यशस्वी टीम मुंबई इंडियन्स सहा सामन्यांत सहा पराभवानंतर गुण न घेता तळाच्या स्थानावर आहे. MI चा संघ सध्या सुरू असलेल्या सामन्यात पुनरागमन करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. संघाच्या एकत्रित पणा न दिल्याने संघला आतापर्यंत अपयशी ठरला आहे.

virat kohli AND suryakumar yadav
करिअर संपलं!...किंग कोहली पहिल्याच चेंडूवर आऊट; चाहते झाले भावूक

गेल्या काही सामन्यांमध्ये दुखापतीतून पुनरागमन केल्यानंतर 31 वर्षीय अनुभवी फलंदाज सूर्यकुमार यादवने काही महत्त्वाच्या खेळी खेळून संघाला विजय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, मात्र त्यालाही फारसे यश मिळाले नाही. दरम्यान 2020 मध्ये त्याने विराट कोहलीसोबत मैदानात झालेल्या वादाचा खुलासा केला आहे.

आयपीएलच्या 13 व्या हंगामातील 48 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला जात होता. या सामन्यादरम्यान कोहली स्लेजिंग करत होता. कोहलीने स्लेजिंग केल्यानंतर तो सुद्धा त्याला टक लावून डोळ्यात डोळ्यात घालून बघत होता. त्यानंतर त्यांची ही प्रतिक्रिया चर्चेचा विषय ठरला. गौरव कपूरच्या ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन शोमध्ये यादवने त्या घटनेबद्दल बोलताना म्हणाला की, ही कोहलीचे खेळण्याची शैली आहे. मैदान त्याची उर्जा पातळी पूर्णपणे वेगळ असते. दोन्ही संघांमध्ये सुरू असलेला हा सामना अत्यंत महत्त्वाचा होता. त्यामुळेच त्या सामन्यातील कोहलीची स्लेजिंग वेगळ्याच पातळीवर होती. दरम्यान मी स्वतःवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करत होतो.

घटनेची आठवण करून देत तो पुढे म्हणाला, मला आठवतं की मी च्युइंग गम चघळत होतो. माझ्या हृदयाची धडधड वेगाने वाढत होती. ना कोहली काही बोलत होता, ना मी काही बोलत होतो. मी स्वतःला सांगत होतो की काहीही झाले तरी एक शब्दही बोलायचा नाही. फक्त 10 सेकंदांची गोष्ट आहे. त्यानंतर पुढील षटक सुरू झाले ही घटना फार काळ चालले नाही. तो क्षणही निघून गेला. त्यानंतर मी त्याला पाहिले. त्या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर आरसीबीने दिलेले 165 धावांचे लक्ष्य एमआय संघाने पाच गडी गमावून सहज गाठले. संघाकडून सूर्यकुमार यादवने 43 चेंडूत 79 धावांची नाबाद खेळी खेळला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com