Virat Kohli MI vs RCB : वाटलं नव्हतं दोघंच सीनियर राहू... विराटने रोहितसोबतच्या 15 वर्षांच्या आठवणींना दिला उजाळा

Virat Kohli Statement About Rohit Sharma
Virat Kohli Statement About Rohit Sharma esakal

Virat Kohli Rohit Sharma : भारतीय क्रिकेट वर्तुळात विराट कोहली आणि रोहित शर्मा हे नाव अनेक वर्षांपासून अग्रक्रमानं घेतलं जात आहे. या दोन वरिष्ठ खेळाडूंशिवाय भारतीय संघाची कल्पना केला जाऊ शकत नाही. नुकतेच विराट कोहलीने रोहित शर्मासोबतचा आपला युवा खेळाडू ते वरिष्ठ खेळाडूपर्यंत पोहचण्याच्या प्रवासाच्या आठवणींना उजाळा दिला. विराट कोहलीने रोहित शर्माचे कौतुक देखील केलं.

Virat Kohli Statement About Rohit Sharma
Jasprit Bumrah IPL 2024 : ....तर जसप्रीत बुमराह 2024 चा टी 20 वर्ल्डकप कॅनडाकडून खेळला असता?

विराट कोहलीने यावेळी खुलेपणाने कबूल केलं की त्याला रोहित आणि तो हे दोघंच वरिष्ठ खेळाडू राहिलो आहोत याचा जरा देखील अंदाज आला नाही. विराट कोहलीने हे वक्तव्य एशियन पेंट्सच्या एका कार्यक्रमात केलं.

विराट कोहली म्हणाला की, 'आमच्या दोन या तीन वरिष्ठ खेळाडूमध्ये एकच भारतीय संघात उरेल असा कधी विचार केला नव्हता. अशा गोष्टी तुमच्या डोक्यात येतच नाहीत. मात्र त्याच्यासोबतचा हा प्रवास खूप चांगला होता.

विराट कोहलीने या कार्यक्रमादरम्यान रोहित शर्माचे खूप कौतुक केले. त्याने रोहितच्या कामगिरीचे देखील कौतुक केले. रोहितने आपल्या कारकीर्दीत कशी प्रगती केली हे तो सांगत होता.

Virat Kohli Statement About Rohit Sharma
IPL 2024 : RCB विरुद्ध सामन्याआधी मुंबई इंडियन्सला मोठा धक्का! विकेटकीपर स्पर्धेतून बाहेर... अचानक संघात मोठा बदल

कोहली म्हणाला की, 'एक खेळाडू म्हणून त्याची प्रगती पाहू आणि त्याने आपल्या कारकीर्दीत केवढी मजल मारली आहे. आता रोहित भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. हे सर्व आश्चर्यकारक आहे.'

(IPL 2024 Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com