Virat Kohli IPL 2023 : ... म्हणून विराटने संधी असूनही RCB सोडलं नाही; किंग कोहलीने केला मोठा खुलासा

Virat Kohli RCB IPL 2023
Virat Kohli RCB IPL 2023Esakal

Virat Kohli RCB IPL 2023 : भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आणि रॉयल चॅलेंजर बेंगलोर हे एक समिकरण झालं आहे. आरसीबी विराटशिवाय आणि विराट आरसीबशिवाय अपूर्ण आहेत. विराट कोहली हा आयपीएलच्या 2008 च्या पहिल्या हंगामापासून आरसीबीकडूनच खेळतोय. त्याने 2013 मध्ये संघाचे नेतृत्व आपल्या खांद्यावर घेतले होते. दरम्यान, आरसीबीने नुकतेच रॉबिन उथप्पाला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत विराट कोहलीने दुसऱ्या एका फ्रेंचायजीने संपर्क साधला होता. मात्र तरी देखील त्याने आरसीबीला सोडले नाही असे सांगितले.

Virat Kohli RCB IPL 2023
RR vs LSG LIVE IPL 2023 : अव्वल स्थानावरील राजस्थानला लखनौ देणार का आव्हान

विराट कोहली मुलाखतीत म्हणाला की, 'मी आरसीबीला, त्यांच्यासोबत केलेल्या इथंवरच्या प्रवासाला इतकं महत्व का देतो याचं कारण म्हणजे त्यांनी मला आयपीएलच्या पहिल्या तीन वर्षात दिलेला पाठिंबा! त्यांनी माला खूप पाठिंबा दिला. ज्यावेळी रिटेंशन झाले त्यावेळी देखील त्यांनी मला सांगितले की आम्ही तुला रिटेन करणार आहोत.'

'मी रे जिनिंग्जला एक उत्तर दिले होते. मला फक्त वरच्या फळीत फलंदाजी करायची आहे. मी भारतासाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करतो मला तिसऱ्याच क्रमांकावर फलंदाजी करायची आहे. त्यावेळी त्यांनी ठीक आहे तू तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करशील असे सांगितले. त्यांनी मला गरज असताना माझ्यावर विश्वास दाखवला. त्यावेळी माझी आंतरराष्ट्रीय कारकीर्द घडतच होती.'

Virat Kohli RCB IPL 2023
Harbhajan Singh Sanju Samson : हरभजनने RR च्या 'या' खेळाडूची केली थेट धोनीशी तुलना; म्हणाला आता टीम इंडियात...

दुसऱ्या एखाद्या फ्रेंचायजीकडून खेळण्याबाबत विराट कोहली म्हणाला की, 'मी कोणाचे नाव घेणार नाही. मात्र एका फ्रेंचायजीने माझ्याशी चर्चा केली होती. ते माझे म्हणणे ऐकून घेण्यासाठी उत्सुक देखील नव्हते. मी त्यावेळी पाचव्या - सहाव्या क्रमांकावर खेळत होतो. मला वरच्या फळीत फलंदाजी करण्याची संधी हवी होती. मला त्याच फ्रेंचायजीमध्ये रहायचे होते. मी भारताकडून 2011 च्या वर्ल्डकपमध्ये देखील कामगिरी केली होती.'

विराट पुढे म्हणाला की, 'रिटेंशनपूर्वी एका फ्रेंजायजीने माझ्याशी संपर्क केला होता. ती फ्रेंचायजी म्हणत होती की तू लिलावात उतर. मात्र त्यांना नकार दिला. मी ज्या फ्रेंचायजीने मला साथ दिली मी त्याच्यासोबतच राहणार आहे.'

(Sports Latest News)

हेही वाचा : What is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com