esakal | IPL 2021: विराट कोहली म्हणतो, "आम्ही कोणाला घाबरत नाही, म्हणूनच..." | Virat Kohli
sakal

बोलून बातमी शोधा

Virat-Kohli-RCB

गेल्या काही दिवसांपासून विराट विविध मुद्द्यांमुळे चर्चेत

विराट म्हणतो, "आम्ही कोणाला घाबरत नाही, म्हणूनच..."

sakal_logo
By
विराज भागवत

IPL 2021 RCB vs RR: यंदाच्या हंगामातील दुसऱ्या टप्प्यात बुधवारी RCB ने राजस्थानला पराभूत केले. RR ने प्रथम फलंदाजी करताना १४९ धावा केल्या. या आव्हानात्मक लक्ष्याचा पाठलाग करताना १७.१ षटकात RCB ने विजय मिळवला. राजस्थानचा सलामीवीर एव्हिन लुईस याने सर्वाधिक ५८ धावा केल्या. तर बंगळुरूकडून ग्लेन मॅक्सवेलने नाबाद अर्धशतक ठोकत संघाला विजय मिळवून दिला. गेले अनेक हंगाम सुमार कामगिरी करणाऱ्या RCBला सूर कसा गवसला? या प्रश्नाचं उत्तर कर्णधार विराट कोहलीने सामना संपल्यानंतर दिलं.

"आमचा संघ गेल्या काही सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करताना दिसतोय. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आम्ही कोणत्याही परिणामांना घाबरत नाही. आम्ही निर्भिडपणे प्रत्येक सामन्यात उतरतो आणि त्याचं फळ आम्हाला आता मिळतंय. त्यासोबतच आम्ही काही गोष्टींचा योग्य पद्धतीने विचार केला आहे. ६ ते १४ या षटकांमध्ये कोणाकडून गोलंदाजी करून घ्यावी याचा प्रश्न आम्ही सोडवला आहे. विकेट्स घ्या आणि सामना जिंका असं धोरण आम्ही राबवतोय. फलंदाजीतही बरीच सुधारणा झाल्याचं दिसतंय. मी आणि देवदत्त पडीकल चांगली सलामी देतोय. मधल्या फळीत एबी डिव्हिलियर्स, श्रीकर भारत आणि ग्लेन मॅक्सवेल सारखे फलंदाज आहेत. त्यामुळे आमच्या सांघिक कामगिरीचा आम्हाला फायदा होतोय", असं विराटने स्पष्ट केलं.

विराटचं युवा पिढीला मार्गदर्शन-

RCBचा आतायपर्यंतचा प्रवास-

पहिल्या टप्प्यात बंगळुरूने ७ सामने खेळले होते. त्यात ७ पैकी 5 सामन्यात विजय मिळवला होता. आता दुसऱ्या टप्प्यात ४ पैकी २ सामन्यात ते विजयी झाले आहेत. त्यामुळे ११ पैकी ७ विजय पटकावत बंगळुरूचा संघ तिसऱ्या स्थानी आहे.

 • बंगळुरु वि. मुंबई - बंगळुरुचा २ गडी राखून विजय

 • बंगळुरु वि. हैदराबाद - बंगळुरुचा ६ धावांनी विजय

 • बंगळुरु वि. कोलकाता - बंगळुरुचा ३८ धावांनी विजय

 • बंगळुरु वि. राजस्थान - बंगळुरुचा १० गडी राखून विजय

 • बंगळुरु वि. चेन्नई - चेन्नईचा ६९ धावांनी विजय

 • बंगळुरु वि. दिल्ली - बंगळुरुचा एका धावेनं विजय

 • बंगळुरु वि. पंजाब - पंजाब किंग्ज ३४ धावांनी विजय

 • बंगळुरू वि. कोलकाता - कोलकाताचा ९ गडी राखून विजय

 • बंगळुरू वि. चेन्नई - चेन्नईचा ६ गडी राखून विजय

 • बंगळुरू वि. मुंबई - बंगळुरूचा ५४ धावांनी विजय

 • बंगळुरू वि. राजस्थान - बंगळुरूचा ७ गडी राखून विजय

loading image
go to top