Virat Kohli : विराट कोहली पुन्हा होणार कर्णधार..? 'या' दिग्गज खेळाडूनं केलं मोठं वक्तव्य

Virat Kohli RCB Captain
Virat Kohli RCB Captainesakal

Virat Kohli RCB Captain : भारताचा माजी ऑफस्पिनर हरभजन सिंगने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे कर्णधारपद विराट कोहलीकडे परत करण्याची भूमिका मांडली असून, पुढील हंगामात संघाला पुढे नेण्यासाठी लागणारी आक्रमकपणा आणि कमिटमेंट या अनुभवी खेळाडूकडे आहे.

कोहली सध्याच्या आयपीएलमध्ये 13 सामन्यांत 661धावा करणारा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. या कालावधीत त्याने 155.16 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या आहेत. RCB 13 सामन्यांत 12 गुणांसह प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहे आणि गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे.

Virat Kohli RCB Captain
KL Rahul : हे तर पेल्यातलं वादळ... केएल अन् गोयंका वादावर लखनौच्या कोचला नेमकं काय म्हणायचंय?

स्टार स्पोर्ट्स कार्यक्रमात हरभजन म्हणाला, 'जर ते पात्र ठरू शकले नाहीत तर त्यांनी भारतीय खेळाडूकडे (कर्णधारपदासाठी) पाहावे. मग विराट कोहलीला कर्णधार का बनवत नाही. धोनीचा चेन्नई सुपर किंग्ज संघावर खूप प्रभाव आहे, विराट कोहली देखील एक महान कर्णधार आहे, त्याला माहित आहे की संघाला कोणत्या प्रकारचे क्रिकेट खेळणे आवश्यक आहे.'

'आता तो खूप आक्रमकतेने, खूप उत्कटतेने खेळतोय आणि विराट कोहलीच्या बाबतीतही तेच आहे. मला विराट कोहलीला जबाबदारीने संघाचे नेतृत्व करताना पाहायला आवडेल.'

Virat Kohli RCB Captain
Punjab Kings: पंजाबचं आव्हान संपताच स्टार ऑलराऊंडरचा IPL 2024 स्पर्धेला गुडबाय; पोस्ट करत दिली माहिती

हरभजन सिंगने लखनौचे मालक संजीव गोयंका आणि केएल राहुल वादावर देखील आपलं मत व्यक्त केलं. तो म्हणाला, 'कर्णधार आणि व्यवस्थापन यांच्यात मतभेद असू शकतात परंतु चर्चा दाराआड व्हायला हवी जी प्रत्येकासाठी चांगली आहे. हे संभाषण ड्रेसिंग रुममध्ये झाले असावे. जे काही संभाषण सुरू आहे, ते संघातील वातावरणासाठी चांगले नाही. ती वेळही असे बोलणे योग्य नव्हते.

(IPL 2024 Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com