Virat Kohli IPL 2023 : मैदानावरच बेडक्या फुगवतो कारण अंपायर.... मारामारी करण्याबाबत विराट कोहली हे काय म्हणाला?

Virat Kohli IPL 2023
Virat Kohli IPL 2023esakal

Virat Kohli IPL 2023 : विराट कोहलीला सामन्यादरम्यान पाहताना असे वाटते की तो कोणत्याही क्षणी एखाद्या खेळाडूबरोबर मारामारी करू शकतो. सध्याच्या क्रिकेट जगतातील तो अँग्री यंग मॅन आहे. विराटला चार्चअप होण्यासाठी छोटसं कारण देखील पुरेसं असतं. मात्र हा मैदानावरील विराट कोहली प्रत्यक्षात मात्र खूपच वेगळा आहे. नकतेच विराट कोहलीने एका मुलाखतीदरम्यान, त्याने लहानपणी कोणासोबत मारामारी केली आहे का या प्रश्नाचे उत्तर दिले. या प्रश्नाचे उत्तर ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटले.

Virat Kohli IPL 2023
Mumbai Indians Playing 11 : जोफ्रा आर्चर खेळणार मग अर्जुन तेंडुलकरचा पत्ता कट होणार?

विराट कोहलीने मुलाखतीदरम्यान सांगितले की तो लहान असताना कोणाशीही मारामारी करायला जायचा नाही. विराट म्हणाला की, 'कोणासोबत मारामारीचा प्रश्नच उद्भवत नाही, कोणीही मला मारून निघून जाईल. मी तर मरून जाईन त्याला समजणार देखील नाही की माझ्यासोबत काय झाले आहे. त्यामुळे मी मारामारी करण्याच्या भानगडीत पडत नाही.'

विराटला आता ज्या पद्धतीने तो मैदानावर आक्रमक अवतारात वावरतो मात्र प्रत्यक्ष मारामारी करण्याची वेळ आली तर तो नक्कीच माघार घेतो.

Virat Kohli IPL 2023
LSG vs GT IPL 2023 Live : पांड्याचे अर्धशतक, गुजरातने लखनौसमोर ठेवले 136 धावांचे आव्हान

विराट म्हणाला की, 'माझ्याकडून काहीही बोलवून घ्या मात्र मी मारामारी करत नाही.' विराट पुढे म्हणाला की, 'मी जो काही आक्रमकपणा दाखवतो तो मैदानावर दाखवतो. मला माहिती असतं की तेथे मारामारी होऊ शकत नाही. कराण तेथे अंपायर मधे येणार.'

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com