IPL 2024 : काव्या मारनची मोठी खेळी! १.५ कोटी किंमत असलेल्या खेळाडूच्या जागी 22 वर्षीय स्पिनरची अचानक संघात एन्ट्री

IPL 2024 : सनरायझर्स हैदराबादची मोठी घोषणा!
Vijayakanth Viyaskanth Replaces Wanindu Hasaranga News Marathi
Vijayakanth Viyaskanth Replaces Wanindu Hasaranga News Marathisakal

Vijayakanth Viyaskanth Replaces Wanindu Hasaranga : आयपीएल 2024 मध्ये दुखापती आणि खेळाडूंच्या अनुपलब्धतेमुळे संघात अनेक बदल करण्यात येत आहेत. यात आता सनरायझर्स हैदराबाद संघानेही आपल्या संघात बदल केले आहेत. पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यापूर्वी सनरायझर्स हैदराबादने आपल्या संघात एका खेळाडूचा समावेश केला आहे.

खरं तर, काही दिवसांपूर्वी दुखापतीमुळे श्रीलंकेचा स्टार गोलंदाज वानिंदू हसरंगा आयपीएलच्या या मोसमातून बाहेर पडला होता. आता संघाने त्याच्या बदलीची घोषणा केली आहे. जिथे त्याने श्रीलंकेच्या आणखी एका खेळाडूचा आपल्या संघात समावेश केला आहे.

Vijayakanth Viyaskanth Replaces Wanindu Hasaranga News Marathi
Team India Squad : हार्दिक पांड्याला टी-20 वर्ल्ड कपमध्ये नाही मिळणार संधी? माजी मुख्य निवडकर्त्याने केलं आश्चर्यकारक विधान

इंडियन प्रीमियर लीगच्या चालू हंगामात वानिंदू हसरंगाच्या जागी श्रीलंकेचा युवा लेगस्पिनर विजयकांत व्यासकांताचा समावेश करण्याची घोषणा सनरायझर्स हैदराबादने मंगळवारी केली. 22 वर्षीय विजयकांतने श्रीलंकेसाठी एक टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे. तो सनरायझर्समध्ये50 लाख रुपयांना सामील झाला आहे, ही त्याची मूळ किंमत होती.

सनरायझर्स हैदराबादने आपल्या सोशल मीडियावर हसरंगाच्या बदलीची माहिती दिली आहे. "इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 च्या उर्वरित सामन्यांसाठी सनरायझर्स हैदराबादने विजयकांत व्यासकांतला जखमी वानिंदू हसरंगाच्या जागी करारबद्ध केले आहे," असे आयपीएलने ट्विटरवर लिहिले आहे.

Vijayakanth Viyaskanth Replaces Wanindu Hasaranga News Marathi
Team India Squad WC 2024 : शेर आया! गेल्या दीड वर्षांपासून भारतीय संघाबाहेर असलेल्या खेळाडूची टीम इंडियात एट्री?

आयपीएल 2024 च्या आधी सनरायझर्स हैदराबादने हसरंगाचा त्यांच्या संघात 1.5 कोटी रुपयांमध्ये समावेश केला. मात्र, डाव्या पायाच्या टाचदुखीमुळे त्याला यंदाच्या आयपीएलमधून बाहेर काढण्यात आले. यापूर्वी तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळला होता.

2022 च्या हंगामात त्याची कामगिरी उत्कृष्ट होती आणि त्याने 7.54 च्या इकॉनॉमीसह 26 विकेट्स घेतल्या. परंतु 2023 मध्ये त्याने फक्त आठ सामने खेळले आणि 8.9 च्या इकॉनॉमीसह नऊ विकेट घेतल्या. हा मोसम सुरू होण्यापूर्वी हसरंगा जबरदस्त फॉर्ममध्ये होता. आणि तो काही अप्रतिम करेल अशी अपेक्षा होती, पण तसे होऊ शकले नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com