CSK हरल्यानंतर जाफरचे 'हे' ट्विट सोशल मीडियावर घालतंय धिंगाणा...

टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफरने त्याच्या खास शैलीत GT चे कौतुक
wasim jaffer video meme  viral
wasim jaffer video meme viral sakal

IPL 2022 : इंडियन प्रीमियर लीगमध्ये रविवारी पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम गुजरात टायटन्स (GT) आणि चेन्नई सुपर किंग्ज (CSK) यांच्यात सामना झाला.असा अप्रितम सामना पाहणारे नेत्रदीपक कालच्या मॅचचे साक्षीदार होते. इंडियन प्रीमियर लीग (IPL) पॉइंट्सच्या शीर्षस्थानी आपले स्थान मजबूत केले आहे. कालच्या थ्रिलर सामान्यामध्ये चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) पराभव झाला. सीएसकेच्या 170 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना GT ची सुरुवात खराब झाले. पण डेव्हिड मिलर (94*) आणि रशीद खान (40) यांच्या धडाकेबाज खेळींमुळे चेन्नईला पराभवाचा सामना करायला लागला. त्यानंतर टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफरने त्याच्या खास शैलीत GT चे कौतुक केले आहे.

जाफरने ट्विटरवर एक मेम शेअर केला आहे. ज्यामध्ये मिलरने CSK च्या तोंडचा घास काढून घेतला आहे. याचे उत्तम वर्णन व्हिडिओ त्या मध्ये केले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया व्हायरल होत आहे. (Wasim Jaffer Video Meme Viral)

आयपीएलच्या 29 व्या सामन्यात आज गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर ऋतुराज गायकवाडने 48 चेंडूत 73 धावांची चमकदार खेळी करत परत फॉर्ममध्ये आला आहे. मधल्या फळीतील फलंदाज अंबाती रायुडूने गायकवाडला चांगली साथ दिली. आणि सीएसकेला 150 धावांचा टप्पा पार करून दिला. नंतर जडेजाच्या 12 चेंडूत 22 धावांच्या जलद खेळीमुळे CSK ला 20 षटकांत 169/5 पर्यंत मजल मारता आले. प्रत्युत्तरात गुजरातची सुरुवात खराब झाले. रिद्धिमान साहा (11), शुभमन गिल (0), विजय शंकर (0) आणि अभिनव मनोहर (12) स्वस्तात तंबूत परतले. त्यानंतर डेव्हिड मिलरने आठ चौकार आणि सहा षटकारांसह नाबाद 94 धावांची अफलातून खेळी केली. कर्णधार रशीद खानने हे आपले बॅटचे कौशल्य दाखवले. रशीदने 21 चेंडूत 40 धावा केल्या आणि GT ला अखेरीस तीन गडी राखून विजय मिळून दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com