IPL 2024 : 18 मे रोजी होणारा RCB Vs CSK सामना पावसामुळे रद्द झाला तर… प्लेऑफसाठी कोण ठरणार पात्र?

RCB vs CSK IPL 2024 Playoff Scenario Qualification : आयपीएल 2024 मध्ये पात्रतेच्या दृष्टिकोनातून सर्वात मोठा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे. प्लेऑफसाठी कोण पात्र ठरतो आणि कोणाचा प्रवास इथेच संपतो हे या एका सामन्यातून ठरवले.
RCB Vs CSK
RCB Vs CSKsakal

RCB vs CSK IPL 2024 Playoff Scenario Qualification : आयपीएल 2024 मध्ये पात्रतेच्या दृष्टिकोनातून सर्वात मोठा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे. प्लेऑफसाठी कोण पात्र ठरतो आणि कोणाचा प्रवास इथेच संपतो हे या एका सामन्यातून ठरवले.

आरसीबी आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील हा सामना 18 मे रोजी चिन्नास्वामी क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. त्यात बेंगळुरूने सलग 5 सामने जिंकले आहेत, त्यामुळे जर आरसीबीने चेन्नईविरुद्ध मोठा विजय मिळवला तर ते प्लेऑफसाठी पात्र ठरेल. पण पावसामुळे सामना रद्द झाला तर प्ले ऑफमध्ये कोण पात्र ठरेल याचा विचार केला आहे का? त्यामुळे जाणून घेऊया संपुर्ण समीकरण काय आहे ते....

RCB Vs CSK
RR vs PBKS : राजस्थान आज प्ले ऑफमध्ये जाणार की पंजाब देणार पराभवाचा धक्का... प्रीती झिंटाच्या संघाचा कर्णधार कोण?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी हा करो किंवा मरो असा सामना असणार आहे. याशिवाय चेन्नईकडेही प्लेऑफ खेळण्याचा मार्ग आहे. हैदराबादने पुढचे दोन सामने गमावले तर चेन्नई सहज प्लेऑफ खेळू शकेल, पण बेंगळुरूसाठी हा एकमेव मार्ग आहे.

अशा परिस्थितीत चाहत्यांसाठी एक प्रश्न उपस्थित केला जात आहे की, जर बेंगळुरूने चेन्नईविरुद्ध मोठा विजय मिळवला तर आरसीबी नक्कीच प्लेऑफसाठी पात्र ठरेल. पण जर हा सामना होऊ शकला नाही आणि सामना पावसामुळे रद्द झाला, तर चेन्नई आणि आरसीबी यांच्यातील प्लेऑफसाठी कोण पात्र ठरेल. आम्ही तुम्हाला सांगतो की जर हा सामना पावसामुळे खेळला गेला नाही तर बेंगळुरू प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर जाईल, तर चेन्नई पात्र ठरेल.

RCB Vs CSK
T20 World Cup 2024 : टी-20 वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाबाबत मोठी बातमी आली समोर... शेड्यूलमध्ये होणार बदल?

या आयपीएल हंगामात बेंगळुरूने आतापर्यंत एकूण 13 सामने खेळले आहेत, त्यापैकी 6 सामने जिंकले आहेत आणि 12 गुणांसह गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. त्याच वेळी, चेन्नई सुपर किंग्ज 13 पैकी 7 सामने जिंकून 14 गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे.

अशा परिस्थितीत जर सामन्यात पाऊस पडला तर दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळेल. अशा स्थितीत चेन्नई 15 गुणांसह प्लेऑफसाठी पात्र ठरेल. पाऊस पडल्यास बेंगळुरूलाही एक गुण मिळेल, पण तरीही आरसीबीला केवळ 13 गुण मिळू शकतील.

हैदराबादचे आधीच 14 गुण आहेत. अशा परिस्थितीत, हैदराबादने पुढचे दोन सामने गमावले तरी, आरसीबीविरुद्ध चेन्नई सामना रद्द झाल्यास बेंगळुरू पात्रता मिळवू शकणार नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com