IPL Mega Auction: U19 वर्ल्डकपमधील कोणता खेळाडू घेणार कोटीच्या कोटी उड्डाणे?

Which current U19 Indian Team Players will may get highest bid in IPL Mega Auction 2022
Which current U19 Indian Team Players will may get highest bid in IPL Mega Auction 2022 esakal

वेस्ट इंडीजमध्ये खेळत असलेला भारताचा 19 वर्षाचा संघ (U19 Indian Team) ऑस्ट्रेलियाला हरवून नुकताच १९ वर्षाखालील वर्ल्डकपच्या (U19 World Cup 2022) फायनलमध्ये पोहचला आहे. याच दरम्यान, भारतात आयपीएल मेगा लिलावाची (IPL Mega Auction 2022) धामधूम सुरू झाली आहे. बीसीसीआयने देखील नुकतीच 590 खेळाडूंची नावे शॉर्टलिस्ट केली. त्यातच 19 वर्षाखालील भारतीय संघाने धडाक्यात फायनलमध्ये प्रवेश केला. त्यामुळे येत्या 12 आणि 13 तारखेला होणाऱ्या आयपीएल लिलावात फ्रेंचायजींची यंदाच्या U19 वर्ल्डकप मधील हिरोंवर नक्कीच नजर असणार. (Which current U19 Indian Team Players will may get highest bid in IPL Mega Auction 2022)

ज्यावेळी 19 वर्षाखालील भारतीय संघाने 2018 चा वर्ल्डकप जिंकला होता. त्यावेळी त्या संघातील पृथ्वी शॉ (Prithvi Shaw), शुभमन गिल (Shubman Gill), शिवम मावी आणि कमलेश नागरकोटी यांना आयपीएलमध्ये चांगली बोली लागली होती. केकेआरने तर गिलला 1.8 कोटी, मावीला 3 कोटी आणि नागरकोटीला 3.2 कोटी रूपये खर्चून आपल्या गोटात खेचले होते. दिल्लीने पृथ्वी शॉसाठी १.२ कोटी रूपये खर्च केले होते. यंदाच्या आयपीएल लिलावात देखील 19 वर्षाखालील संघातील काही खेळाडू कोटीच्या कोटी उड्डाणे घेण्याची शक्यता आहे.

Which current U19 Indian Team Players will may get highest bid in IPL Mega Auction 2022
'जर कोरोना रूग्णसंख्या वाढली नाही तरच आयपीएल...'

या यादीत सर्वात वरचा नंबर लागतो तो भारतीय 19 वर्षाखालील संघाचा कर्णधार यश धुलचा (Yash Dhull). त्याने नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया (Australia) विरूद्धच्या सामन्यात शतकी खेळी केली आहे. विशेष म्हणजे चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येत यश धुलने 110 चेंडूत 110 धावांची खेळी केली. त्यात 10 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश होता.

यश धुल बरोबरच संघातील धष्टपुष्ट अष्टपैलू खेळाडू राजवर्धन हंगरगेकर (Rajvardhan Hangargekar) याच्यावरही अनेक फ्रेंचायजींचा डोळा असणार आहे. त्याने यंदाच्या वर्ल्डकपमध्ये आपल्या वेगवान गोलंदाजीबरोबरच वेगवान खेळीनेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याचा मोठे फटके मारण्याचा हातखंडा पाहता त्याच्यासाठी अनेक फ्रेंचायजींमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता आहे.

Which current U19 Indian Team Players will may get highest bid in IPL Mega Auction 2022
'कॅप्टन' रोहितची पहिल्या मालिकेपूर्वीची पोस्ट व्हायरल

हरनूर सिंग (Harnoor Singh) या डावखुऱ्या शैलीदार फलंदाजावरही आयपीएलमध्ये चांगली बोली लागू शकते. त्याने देखील यंदाच्या वर्ल्डकपमध्ये काही आकर्षक खेळी साकारल्या आहेत. हरनूर सिंग बरोबरच संघाचा उपकर्णधार आणि यश धुलचा उत्तम बॅटिंग पार्टनर शेख राशीद (Shaik Rasheed) देखील आयपीएल लिलावात (IPL Auction) चर्चेत राहणारा खेळाडू ठरू शकतो. धुल आणि राशीद ही संध्याच्या 19 वर्षाखालील भारतीय संघाच्या फलंदाजीचा बॅकबोन आहे.

या बरोबरच संघातील निशांत सिंधू, दिनेश बना, राज बवा (Raj Bawa), विकी ओत्सवाल आणि कुशल तांबे यांच्यावरही आयपीएल फ्रेचायजींचे लक्ष नक्की असणार.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com