IPL 2024 Mistry Girl : रोहित, हार्दिकसोबत फोटो व्हायरल... कोण आहे मिस्ट्री गर्ल सेजल जैस्वाल?

Sejal Jaiswal Mumbai Indians Mistry Girl : सेजलने मुंबई इंडियन्सच्या अनेक स्टार खेळाडूंसोबत फोटो काढून ते सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Rohit Sharma Sejal Jaiswal
Rohit Sharma Sejal Jaiswalesakal

Sejal Jaiswal Mumbai Indians Mistry Girl :

आयपीएलच्या 17 व्या हंगामात मुंबई इंडियन्स पहिल्या दोन सामन्यात संघर्ष करताना दिसतोय. पहिल्या दोन्ही सामन्यात मुंबईने कडवी फाईट देऊनही पदरी पराभवच पडला आहे. दरम्यान खेळाडूंवर विशेषकरून कर्णधार हार्दिक पांड्यावर सगळीकडून टीकेचा भडीमार होत आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. या फोटो आणि व्हिडिओत एक सुंदर महिला मुंबई इंडियन्सच्या स्टार क्रिकेटपटूंसोबत दिसत आहे. मुंबईच्या चाहत्यांमध्ये या महिलेविषयी जाणून घेण्याची उत्सुकता लागून राहिली आहे. या मिस्ट्री गर्लने रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराहसोबत फोटो काढले आहेत.

Rohit Sharma Sejal Jaiswal
IPL 2024 Hardik Pandya : मुंबई इंडियन्समध्ये माजली दुफळी... टीम रोहित अन् हार्दिक पांड्याचा वेगळा गट?

सोशल मीडियावर फोटो व्हायरल

मुंबई इंडियन्सच्या स्टार खेळाडूंसोबत फोटो काढणारी ही मिस्ट्री गर्ल क्षणार्धात सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या तरूणीचे नाव आहे सेजल जैस्वाल! तिने आपल्या इन्स्टाग्रामवरून रील प्रसिद्ध केलं आहे. यात मुंबई इंडियन्सचे अनेक खेळाडूंनी विमानात या तरूणीसोबत फोटो काढले आहेत.

सेजल कधी रोहित तर कधी हार्दिक पांड्यासोबत दिसते. या रीलमध्ये लसिथ मलिंगा, टीम डेव्हिड, पियूष चावला, तिलक वर्मासारखे अनेक मुंबई इंडियन्सचे खेळाडू देखील आहेत.

Rohit Sharma Sejal Jaiswal
पराभवाच्या गर्तेत अडकलेल्या MI साठी मोठी बातमी! सूर्याच्या दुखापतीवर BCCI च्या सूत्रांनी दिली मोठी अपडेट

कोण आहे सेजल जैस्वाल?

सेजस जैस्वाल ही एक अभिनेत्री आहे. यापूर्वी ती फिजिओथेरपिस्ट देखील राहिली आहे. तिने दिल मांगे मोर आणि डेटिंग इन डार्क या सारख्या काही मालिकांमध्ये देखील काम केलं आहे. 19 वर्षाची असताना सेजलने मॉडेलिंगमध्ये आपला हात आजमावला होता. तिच्या काही फोटोवरून ती मुंबई इंडियन्सची जबरदस्त चाहती असल्याचे दिसून येते.

(IPL Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com