
रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू (आरसीबी) ने आयपीएल 2025 च्या क्वालिफायर 1 मध्ये पंजाब किंग्जचा (पीबीकेएस) धुव्वा उडवत फायनलमध्ये धडक मारली. 29 मे रोजी मुल्लानपूरच्या महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या सामन्यात पंजाब किंग्जने प्रथम फलंदाजी करताना अवघ्या 101 धावांत गुंडाळले गेले. आरसीबीने हे लक्ष्य 10 षटकांतच पार केले आणि चौथ्यांदा आयपीएच्या फायनलमध्ये प्रवेश केला.
सामन्यानंतर विराट कोहलीने आपली पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माला इशाऱ्याने सांगितले, “अजून एक बाकी आहे!” हा इशारा 3 जूनला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या फायनल सामन्याकडे होता. म्हणजे विराटेन विश्वास व्यक्त केला की फायनलचा वीनर फिक्स असून आम्हीच ट्रॉफी उचलणार आहे.