
RCB vs PBKS IPL 2025 Final: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची 17 वर्षांची प्रतीक्षा संपली आहे. गेल्या 17 वर्षांपासून अनेक वेळा पराभव आणि थट्टेचा सामना करणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने अखेर पहिल्यांदाच इंडियन प्रीमियर लीगचे विजेतेपद पटकावले आहे. रजत पाटीदारच्या नेतृत्वाखालील बंगळुरूने रोमांचक अंतिम सामन्यात पंजाब किंग्जचा 6 धावांनी पराभव केला.
दरम्यान, अभिनेता नकुल मेहताचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्याने व्हिडिओत असे म्हटले होते की जर आरसीबीने अंतिम सामना जिंकला तर तो विजय मल्ल्याचे सर्व कर्ज फेडेल.