Team India : IPL ठरतेय इंजरी प्रीमियर लीग! टीम इंडियाची चिंता वाढली, 4 खेळाडू जखमी, संघात होणार बदल?

हाय व्होल्टेज कसोटी सामन्यापूर्वी दुखापतीमुळे टीम इंडियाचे वाढले टेन्शन
Indian Players Injured ipl
Indian Players Injured ipl

Indian Players Injured IPL : भारतीय संघाला पुढील महिन्यात आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळायचा आहे. 7 जूनपासून लंडनमधील ओव्हल येथे ऑस्ट्रेलिया आणि भारत (IND vs AUS) यांच्यात विजेतेपदाची लढत होणार आहे. भारत सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहोचला आहे. हा संघ विजयाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे.

मात्र या हाय व्होल्टेज कसोटी सामन्यापूर्वी दुखापतीमुळे टीम इंडियाचे टेन्शन वाढले आहे. आयपीएलमुळे भारतीय खेळाडूंना सतत दुखापत होत आहे. आयपीएल भारतासाठी इंजरी प्रीमियर लीग बनली आहे. दोन दिवसांत भारताचे दोन खेळाडू जखमी झाले आहेत. ते बराच काळ संघाबाहेर राहणार हे निश्चित आहे. अशा प्रकारे एकूण 4 भारतीय खेळाडू अनफिट आहेत जे जागतिक कसोटी चॅम्पियनशिप संघाचा भाग आहेत.

Indian Players Injured ipl
Kohli-Gambhir Fight: कोहली अन् गंभीर मैदानात का भिडले? जाणून घ्या संपूर्ण भांडणाची Inside Story

लखनौ सुपर जायंट्सचे दोन खेळाडू एकाच दिवशी जखमी झाले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्यापूर्वी रविवारी संघाचा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट नेटवर गोलंदाजी करताना पडला. त्याच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली आहे.

त्याचवेळी संघाविरुद्धच्या सामन्यादरम्यान केएल राहुल जखमी झाला होता. त्याच्या हॅमस्ट्रिंगला दुखापत झाली आहे. त्याला नीट चालताही येत नव्हते. हे दोन्ही खेळाडू वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाचा भाग आहेत.

Indian Players Injured ipl
IPL 2023: भांडण आलं अंगाशी... BCCI ने विराट कोहली अन् गौतम गंभीरवर घेतली मोठी ॲक्शन

अष्टपैलू खेळाडू म्हणून भारतीय संघात समाविष्ट झालेला शार्दुल ठाकूरही दुखापतग्रस्त आहे. शार्दुल तीन सामन्यांतून बाहेर होता. गुजरातविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात तो फलंदाज म्हणून तिसऱ्या क्रमांकावर खेळला होता. त्याने एकही षटक टाकले नाही.

यासोबतच केकेआरकडून खेळणारा उमेश यादवही जखमी झाला आहे. उमेशच्या हाताला दुखापत झाली आहे. उमेश हा जागतिक चॅम्पियनशिप संघात समाविष्ट असलेला सर्वात अनुभवी भारतीय वेगवान गोलंदाज आहे.

Indian Players Injured ipl
IPL 2023 : बदला... बदला...! रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने राहुल ब्रिगेडला घरात घुसून लोळवले

आयपीएलमध्ये कोरोनानंतर खेळाडूंना खूप प्रवास करावा लागत आहे. या मोसमात होम आणि अवे नियम पुन्हा सुरू झाला आहे. त्यामुळे खेळाडूंना सतत प्रवास करावा लागतो. रात्री उशिरापर्यंत सामने सुरू आहेत. खेळाडूंच्या दुखापतींचे हे एक प्रमुख कारण आहे.

आयपीएलपूर्वीही टीम इंडिया सातत्याने सामने खेळत आहे. त्याचा परिणाम आता खेळाडूंवर दिसून येत आहे. टेस्ट चॅम्पियनशिप फायनलपूर्वी टीम इंडियासाठी ही चांगली बातमी नाही. सध्या लीगमध्ये जवळपास 30 सामने बाकी असून जखमी खेळाडूंची संख्या वाढू शकते. त्यामुळे टीम इंडियात निवडलेल्या संघात बदल होतोय का नाही हे पाहावे लागेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com