Yashasvi Jaiswal : यशस्वी जैसवालने एका दगडात दोन नाही.. तीन नाही... तर मारले तब्बल पाच पक्षी

Yashasvi Jaiswal IPL Records
Yashasvi Jaiswal IPL Recordsesakal

Yashasvi Jaiswal IPL Records : यशस्वी जैसवालने इडन गार्डनवर इतिहास रचला. त्याने आयपीएल इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतक ठोकले. यशस्वीने 13 चेंडूत 50 धावा करत केएल राहुल आणि पॅट कमिन्स यांचे 14 चेंडूत अर्धशतक झळकावण्याचा विक्रम मोडीत काढला. यशस्वीने केकेआरविरूद्ध 47 चेंडूत 98 धावांची दमदार खेळी केली. यात 5 षटकारांचा समावेश होता. यशस्वी जैसवालने याच हंगामात शतकी खेळी देखील केली होती. तो आता फाफ ड्युप्लेसिस सोबत ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आघाडीवर आहे. तो ड्युप्लेसिसच्या फक्त 1 धाव मागे आहे.

Yashasvi Jaiswal IPL Records
Viral Video : नाद खुळा! स्टेडियममध्ये गेला अन् खुर्च्यावर झोपून मोबाईलमध्येच बघितली मॅच

यशस्वी जैसवालने आपल्या या धडाकेबाज खेळीत पाच माईल स्टोन पार केले.

1 - यशस्वी जैसवालने 13 चेंडूत अर्धशतक ठोकत आयपीएल इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतक ठोकले.

2 - हे अर्धशतक षटकांच्या बाबतीही वेगवान ठरले. यशस्वी जैसवालने 2.5 षटकातच आपले अर्धशतक ठकले होते.

3 - यशस्वी जैसवालने केकेआरचा कर्णधार नितीश राणाला डावाच्या पहिल्याच षटकात 26 धावा चोपल्या. तो आयपीएल इनिंगच्या पहिल्याच षटकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. यापूर्वी पृथ्वी शॉने 2021च्या हंगामात पहिल्या षटकात 24 धावा केल्या.

Yashasvi Jaiswal IPL Records
Virat Kohli Yashasvi Jaiswal : विराटनं यशस्वीचं कौतुक करणारे ट्विट केले त्वरित डिलीट, नेटकरी म्हणतात...

4 - याचबरोबर आयपीएलच्या इतिहासात पहिल्या षटकात 26 धावा या संयुक्तरित्या दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक धावा ठरल्या. यापूर्वी रॉयल चॅलेंजर बेंगलोरने मुंबई इंडियन्सविरूद्धच्या 2011 च्या सामन्यात पहिल्या षटकात 27 धावा ठोकल्या होत्या.

5 - आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक धावा करणारा अनकॅप प्लेअर म्हणूनही यशस्वी जैसवाल आता अव्वल स्थानावर आहे. त्याने इशान किशनला मागे टाकले. जैसवालच्या सध्या 575 धावा झाल्या आहेत. इशान किशनने 2020 च्या आयपीएल हंगामात 516 धावा ठोकल्या होत्या.

(Sports Latest News)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com