

Yashvi Patel
esakal
मुंबई : पुण्याची यश्वी पटेल व मुंबई उपनगरचा अर्जुन अलुगुवेली यांनी मुंबईत पार पडलेल्या राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत (१९ वर्षांखालील) अजिंक्यपदाला गवसणी घातली. ग्रेटर मुंबई बॅडमिंटन संघटना आयोजित, बॅडमिंटन गुरुकुल प्रवर्तित आणि विलिंग्डन क्लब यांच्या यजमानपदाखाली ही स्पर्धा पार पडली.