
VIDEO : सीएसकेला ट्रोल करणाऱ्या युवराजला रैनाने दिले भन्नाट उत्तर
चेन्नई सुपर किंग्ज यंदाच्या आयपीएल हंगामात फारशी चमकदार कामगिरी करता आलेली नाही. विशेष म्हणजे कर्णधार बदलून देखील त्यांची पराभवाची मालिका सुरूच आहे. मुंबई विरूद्धच्या सामन्यात तर चेन्नई फक्त 97 धावात ऑल आऊट झाली. ही त्यांची दुसऱ्या क्रमांकाची आयपीएलमधील सर्वात कमी धावसंध्या होती. विशेष म्हणजे चेन्नईची सर्वात कमी धावसंख्या (79) देखील रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स विरूद्धच झाली होती.
हेही वाचा: पुढचा आयपीएल हंगाम खेळणार? खुद्द धोनीनेच दिले संकेत
या सामन्यात चेन्नईकडून फक्त कर्णधार महेंद्रसिंह धोनीनेच झुंजार खेळी करत नाबाद 36 धावा केल्या. त्यानंतर मुंबईने 5 विकेट गमावून 97 धावांचे आव्हान पार केले. दरम्यान, चेन्नईच्या या खराब कामगिरीवरून सोशल मीडिायवर त्यांना चांगलेच ट्रोल केले जात होते. या ट्रोलिंगमध्ये भारताचा माजी फलंदाज युवराज सिंग देखील आघाडीवर होता. त्याने शेजारी बसलेल्या सीएसकेचा जुना खेळाडू सुरेश रैनाची देखील खेचली.
सुरेश रैना आणि युवराज सिंग हे दोघे चेन्नई 97 धावांवर ऑल आऊट झाली त्यावेळी एकत्रच होते. रैना युवराजच्या शेजारीच बसला होता. त्यावेळी युवराजने सेल्फी व्हिडिओ घेत सुरेश रैनाला 'रैना तुमचा संघ 97 धावांवर ऑल आऊट झाला. तुम्हाला याबबात काही म्हणायचं आहे काय?' असा प्रश्न विचारला. त्यावर रैनाने 'मी त्या सामन्यात नव्हतो.' असे उत्तर दिले.
हेही वाचा: 'आम्ही भारताच्या मागे का धावावे?' माजी PCB अध्यक्ष बरळले
चेन्नई सुपर किंग्जने यंदाच्या हंगामात 12 सामन्यात फक्त 8 गुण मिळवले आहेत. ते सध्या गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहेत. आता चेन्नईसमोर उरलेल्या दोन सामन्यात विजय मिळवून आयपीएल 2022 हंगामाची सांगता चांगली करण्याचे आव्हान असणार आहेत.
Web Title: Yuvraj Singh Trolled Csk Suresh Raina Answered After Chennai Super Kings Defeat
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..