esakal | लहाणग्या ‘इरा’ची बुद्धिबळ स्पर्धेत कांस्य पदकाला गवसणी
sakal

बोलून बातमी शोधा

Ira bohra

लहाणग्या ‘इरा’ची बुद्धिबळ स्पर्धेत कांस्य पदकाला गवसणी

sakal_logo
By
सम्राट कदम @namastesamrat

पुणे : राष्ट्रीय शालांत बुद्धिबळ स्पर्धेत इरा बोहरा या लहानगीने कांस्य पदकाला गवसणी घातली आहे. सात वर्षांखालील मुलींच्या ऑनलाइन बुद्धीबळ स्पर्धेत तीने हे यश प्राप्त केले आहे. इरा ही कल्याणी नगर येथील बिशॉप्स को-एड स्कूलची विद्यार्थीनी असून, आता ती अधिकृतपणे जगभरातील भारताचे प्रतिनिधित्व करेल.

स्थानिक, जिल्हा व राज्य बुद्धिबळ स्पर्धांमध्ये गेल्या दोन वर्षांपासून इरा सतत विजय मिळवत आहे. अलीकडेच, ती महाराष्ट्र राज्य शाळा अन्डर सेव्हन गर्ल्स चॅम्पियन बनली आहे. आशिर्वाद तुपे यांच्या मार्गदर्शनाखाली साऊथ मुंबई चेस अकॅडमीमध्ये इराने पाच वर्षांची असताना बुद्धिबळ शिकण्यास सुरुवात केली. नंतर तिने प्रशिक्षक विश्वनाथ सांदिल्य यांच्यासमवेत प्रशिक्षण घेतले. वयाच्या पाचव्या वर्षी तिने प्रतिष्ठित महापौर करंडक पुणे २०२० आणि महाराष्ट्र राज्य शाळा २०१९ मध्ये अनुक्रमे द्वितीय व आठवा क्रमांक मिळविला.

loading image