अखेरच्या 3 मिनिटात 2 गोल करत इराणने साकारला वर्ल्डकपमधील पहिला विजय | FIFA World Cup 2022 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

FIFA World Cup 2022 Iran Defeat Wales

FIFA World Cup 2022 : अखेरच्या 3 मिनिटात 2 गोल करत इराणने साकारला वर्ल्डकपमधील पहिला विजय

FIFA World Cup 2022 : ग्रुप B मधील पहिल्या सामन्यात इंग्लंडकडून अर्धा डझन गोल खालेल्या इराणने दुसऱ्याच सामन्यात जोरदार पुनरागमन करत वेल्स विरूद्ध इंज्यूरी टाईमच्या शेवटच्या तीन मिनिटात दोन गोल करत विजय मिळवला. दोन्ही हाफमध्ये इराणने वेल्सवच्या गोलपोस्टवर सातत्याने चढाया केल्या होत्या. मात्र त्यांना गोल करण्याची संधी मिळाली नाही. मात्र शेवटच्या मिनिटापर्यंत इराणने जिद्द सोडली नाही. अखेर रोझबेन चेश्मामीने 11 मिनिटाच्या इंज्यूर टाईममध्ये 8 व्या मिनिटाला वेल्सवर पहिला गोल डागला. त्यानंतर अवघ्या 3 मिनिटात 11 व्या मिनिटाला रामिन रिझाईनने दुसरा गोल करत इराणचा पहिला वहिला विजय निश्चित केला.

हेही वाचा: Match Fixing : श्रीलंका - पाकिस्तान सामन्यात झाली होती फिक्सिंग; ICC करणार तपास?

इंग्लंडवरिूद्ध दुसऱ्या हाफमध्ये आणि इंज्यूरी टाईममध्ये गोल करून इराणने आपली झुंजार वृत्ती दाखवून दिली होती. याच झुंजारवृत्तीचे दर्शन त्यांनी वेल्स विरूद्धच्या सामन्यातही दाखवून दिले. त्यांनी पहिल्यापासूनच वेल्सच्या गोलपोस्टवर सातत्याने चढाया केल्या. त्यांनी सामन्यात तब्बल 21 चढाया केल्या. त्यातील सहा ऑन टार्गेट होत्या. तर दुसरीकडे वेल्सने 10 वेळा इराणच्या गोलपोस्टवर चाल केली मात्र त्यातील 3 वेळाच त्यांचे शॉट्स ऑन टार्गेट होते. वेल्स बॉलवर ताबा मिळवण्यात आणि पासेसच्या बाबतीत इराणपेक्षा सरस असली तरी इराणच्या आक्रमकतेपुढे ते हतबल ठरले.

हेही वाचा: Shikhar Dhawan : ते 40 वे षटक... कर्णधार धवनने सांगितले भारताच्या हातून सामना कधी निसटला

विशेष म्हणजे या सामन्यात धुसमुसळ्या खेळाचे देखील प्रदर्शन दोन्ही संघानी केले. यामुळेच वेल्सचा गोलकिपर वेन हेन्सीला रेड कार्ड मिळाले. याचबरोबर इराणच्या दोन तर वेल्सच्या एका खेळाडूला यलो कार्ड मिळाले.