श्रीलंका - पाकिस्तान सामन्यात झाली होती फिक्सिंग; ICC करणार तपास? | Sri Lanka Vs Pakistan Test Match Fixing | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sri Lanka Vs Pakistan Test Match Fixing

Match Fixing : श्रीलंका - पाकिस्तान सामन्यात झाली होती फिक्सिंग; ICC करणार तपास?

Sri Lanka Vs Pakistan Test Match Fixing : श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात यावर्षी झालेल्या एका कसोटी सामन्यात मॅच फिक्सिंग झाल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, या प्रकरणाची खोलात जाऊन चौकशी करण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने घेतला आहे. या वर्षीच्या जुलै महिन्यात झालेल्या कसोटी सामन्यात मॅच फिक्सिंग झाल्याचे आरोप करण्यात आले आहे. हा सामना पाकिस्तानने जिंकला होता. पाकिस्तानचा फंलदाज अब्दुल्ला शफीफने 160 धावांची दमदार खेळी केली होती. पाकिस्तानने चौथ्या डावात 342 धावांचा पाठलाग करत हा सामना जिंकला होता.

हेही वाचा: Shikhar Dhawan : ते 40 वे षटक... कर्णधार धवनने सांगितले भारताच्या हातून सामना कधी निसटला

दरम्यान, या सामन्याची चौकशी करण्याची मागणी श्रीलंका क्रिकेट बोर्डाने केली होती. यानंतर अँटी करप्शन युनिटला या प्रकरणाची चौकशी करण्यास पाचारण करण्यात आले. श्रीलंकेच्या सभागृहातील नेते नलिन बंडारा यांनी या सामन्यात मॅच फिक्सिंग झाल्याची शंका बोलून दाखवली होती. यामुळेच श्रीलंकेवर खराब कामगिरीनंतर आश्चर्यकारक आरोप होत आहेत. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने आपल्या कार्यकारणीच्या बैठकीनंतर आयसीसीच्या अँटी करप्शन युनिटच्या प्रमुखांना या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले. सध्या तरी आयसीसीच्या या युनिटने या प्रकरणी कोणतेही भाष्ट केलेले नाही. मात्र आयसीसी अँटी करप्शन युनिटच्या अधिकाऱ्यांना या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पाठवणार आहे.

हेही वाचा: IND vs NZ : पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा पराभव करत केले अनेक विक्रम

श्रीलंकेच्या संसदेत सदस्य नलिन बंडारा यांनी वक्तव्य केले होते की, श्रीलंका क्रिकेट बोर्डमधील प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या भ्रष्टाचारात सामील आहे. यामुळे श्रीलंका या सामन्यात पराभूत झाली. क्रिकबजने या प्रकरणी संसद सदस्य नलिन यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला त्यावेळी ते म्हणाले की, 'सध्या थोडी अडचण आहे या विषयी मी उद्या बोलणार आहे.' मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी मॅच फिक्सिंगचे आरोप करताना ठोस असे पुनावे दिलेले नाही. मात्र क्रिकेट बोर्डावर आरोप करून त्यांनी श्रीलंका क्रिकेटला पुन्हा एकदा आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे.

श्रीलंका पाकिस्तान यांच्यात झालेल्या या कसोटी मालिकेतील पहिले दोन सामने हो अनिर्णित राहिले होते. मात्र तिसरा आणि शेवटचा सामना पाकिस्तानने चौथ्या डावात 342 धावांचे आव्हान पार करून जिंकला होता. याचबरोबर मालिका देखील खिशात टाकली होती.

हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार...