IRE vs IND : भारताने आयर्लंडचा 7 विकेट्सनी केला पराभव; मालिकेत 1 - 0 आघाडी

भारत आणि आयर्लंड यांच्यातील दोन सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिला सामना आज खेळला जात आहे.
Ireland vs India 1st T20I Live Cricket Score ire vs ind Highlights
Ireland vs India 1st T20I Live Cricket Score ire vs ind Highlightsesakal

डब्लिंग : भारताने पहिल्या टी 20 सामन्यात आयर्लंडचा सात गडी राखून पराभव करत मालिकेत 1 - 0 अशी आघाडी घेतली आहे. पावसामुळे प्रत्येकी 12 षटकांचा झालेल्या सामन्यात आयर्लंडने 109 धावांचे आव्हान भारतासमोर ठेवले होते. भारताने हे आव्हान 9.3 षटकात 3 फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. भारताकडून दीपक हुड्डाने 47 धावांची नाबाद खेळी केली. तर इशान किशनने 26 तर हार्दिक पांड्याने 24 धावांचे योगदान दिले.

94-3 : हार्दिक पांड्या बाद 

पांड्या - हुड्डाची 32 चेंडूत केलेली 64 धावांची भागीदारी जोशुआ लिटिलने संपवली. त्याने 12 चेंडूत 24 धावांची खेळी करणाऱ्या हार्दिक पांड्याला बाद केले.

हुड्डा - पांड्याची दमदार अर्धशतकी भागीदारी

30-2 : सूर्यकुमारचा गोल्डन डक

क्रेग यंगने इशान किशनचा त्रिफळा उडवल्यानंतर पुढच्याच चेंडूवर क्रेगने सूर्यकुमार यादवला देखील पायचित बाद करत भारताला सलग दुसरा धक्का दिला.

आक्रमक इशानचा क्रेग यंगने उडवला त्रिफळा

भारताचा सलामीवीर इशान किशनने 11 चेंडूत 26 धावा चोपून चांगली सुरूवात केली होती. मात्र क्रेग यंगने त्याचा त्रिफळा उडवत भारताला पहिला धक्का दिला.

भारताची पहिल्याच षटकात दमदार सुरूवात

भारताचा सलामीवीर इशान किशनने पहिल्याच षटकात 15 धावा चोपून भारताला चांगली सुरूवात करून दिली.

हॅरी टॅक्टरचे दमदार अर्धशतक

हॅरी टॅक्टरने 33 चेंडूत नाबाद 64 धावांची दमदार खेळी करत आयर्लंडला 4 विकेट्सच्या मोबदल्यात 108 धावांपर्यंत पोहचवले.

72-4 : चहलने केली शिकार

युझवेंद्र चहलने आयर्लंडची 50 धावांची भागीदारी रचणारी जोडी फोडली. त्याने लॉरकेन टकरला 18 धावांवर बाद करत आयर्लंडचा चौथा फलंदाज बाद केला.

हॅरी टेक्टरची आक्रमक फलंदाजी

भारताकडून पदार्पण करणाऱ्या उमरान मलिकचे पहिले षटक फारसे चांगले गेले नाही. हॅरी टेक्टरने त्याच्या या षटकात 18 धावा चोपल्या.

22-3 : आवेश खाननेही विकेटचे खाते उघडले

आवेश खानने ग्रेथ डेलनेला 8 धावांवर बाद करत आपले विकेटचे खाते उघडले.

6-2 : हार्दिकने आयर्लंडला दिला दुसरा धक्का

सामन्याचे दुसरे षटक टाकण्यासाठी आलेल्या कर्णधार हार्दिक पांड्याने आयर्लंडच्या पॉल स्टर्लिंगला 4 धावांवर बाद करत दुसरा धक्का दिला. आयर्लंडच्या पहिल्या दोन षटकात दोन विकेट पडल्या.

1-1 : आयर्लंडला पहिला धक्का

सामन्याच्या पहिल्याच षटकात भुवनेश्वर कुमारने आयर्लंडला पहिला धक्का दिला. त्याने कर्णधार अँड्र्यू बालबिर्नेला शुन्यावर बाद केले.

  • पावसामुळे सामना 12-12 षटकांचा, 11:20 होणार सुरू

    भारत आणि आयर्लंड यांच्यातील पहिल्या सामन्यात पावसामुळे दोन तासांचा वेळ वाया गेला. नाणेफेकीनंतर सामना 9:10 वाजता सुरू होणार होता. मात्र पावसामुळे ते होऊ शकले नाही. सामना आता 11:20 वाजता सुरू होईल आणि 12-12 षटकांचा खेळवला जाणार आहे.

सामना काही वेळात सुरू होऊ शकतो. खेळपट्टीवरून कव्हर काढण्यात आले आहे.

पावसामुळे सामना उशिरा होणार सुरू; भारताने नाणेफेक जिंकून घेतला गोलंदाजी निर्णय

  • भारताने नाणेफेक जिंकली

    भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. वेगवान गोलंदाज उमरान मलिक पदार्पण सामना खेळणार आहे. या सामन्यात संजू सॅमसनला संधी मिळालेली नाही.

  • भारत - ऋतुराज गायकवाड, ईशान किशन, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, अवेश खान, युजवेंद्र चहल, उमरान मलिक

  • आयरलैंड - पॉल स्टर्लिंग, एंड्रयू बालबर्नी, गैरेथ डेलानी, हैरी टेक्टर, लोर्कन टकर, जॉर्ज डॉकरेल, मार्क अडायर, एंडी मैकब्राइन, क्रेग यंग, जोशुआ लिटिल, कोनोर ओल्फर्ट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com