IRE vs IND 2nd T20 : भारताने मालिका घातली खिशात, आयर्लंडचा दुसऱ्या सामन्यात 33 धावांनी पराभव

Ireland Vs India 2nd T20I
Ireland Vs India 2nd T20I esakal

Ireland Vs India 2nd T20I : भारताने दुसऱ्या टी 20 सामन्यात आयर्लंडचा 33 धावांनी पराभव करत तीन सामन्यांची मालिका 2 - 0 अशी खिशात घातली. भारताचे 186 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या आयर्लंडने सलामीवीर अँड्र्यू बारबिर्नेच्या झुंजार 72 धावांच्या जोरावर 152 धावांपर्यंत मजल मारली. भारताकडून रवी बिश्नोई आणि प्रसिद्ध कृष्णाने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

भारताने दुसऱ्या टी 20 सामन्यात आयर्लंविरूद्ध विजयासाठी 186 धावांचे आव्हान ठेवले. भारताकडून सलामीवीर आणि उपकर्णधार ऋतुराज गायकवाडने 58 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर संजू सॅमसनने 26 चेंडूत 40 धावा चोपल्या.

संजू आणि ऋतुच्या 71 धावांच्या भागीदारीनंतर रिंकू सिंहने आपल्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय डावात धडाकेबाज फलंदाजी केली. त्याने स्लॉग ओव्हरमध्ये 21 चेंडूत 38 धावा करत भारताला 180 च्या पार पोहचवले. त्याला शिवम दुबेने 16 चेंडूत नाबाद 22 धावा करत चांगली साथ दिली.

बलबिर्नेचे अर्धशतक 

आयर्लंडचा सलामीवीर अँड्र्यू बलबिर्नेने झुंजार अर्धशतकी खेळी करत संघाला शतकी मजल मारून दिली.

53-3 (8 Ov) : आयर्लंडचे अर्धशतक मात्र तीन झटकेही 

भारताचे 186 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या आयर्लंडने आक्रमक सुरूवात करण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न प्रसिद्ध कृष्णाने हाणून पाडला. त्याने स्टिर्लिंग आणि टकर यांना शुन्यावर बाद केले.

आयर्लंडसमोर विजयासाठी 186 धावांचे आव्हान 

105-3  : संजूने डाव सावरला मात्र 

यशस्वी जैसवाल 18 धावा करून बाद झाल्यानंतर आलेला तिलक वर्मा देखील 2 चेंडूत 1 धाव करून बाद झाला. दरम्यान, जम बसलेल्या ऋतुराज गायकवाडने संजू सॅमसनच्या साथीने भारताचा डाव सावरला.

या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 71 धावांची दमदार भागीदारी रचली. मात्र संजू सॅमसन 26 चेंडूत 40 धावा करून बाद झाला. त्यानंतर ऋतुराजने अर्धशतकी खेळी करत भारताला 15 षटकात 129 धावांपर्यंत पोहचवले.

भारताला पहिला धक्का 

भारताचा सलामीवीर यशस्वी जैसवाल दुसऱ्याही टी 20 सामन्यात चांगली सुरूवात करून बाद झाला. त्याला क्रेग यंगने 18 धावांवर बाद केले.

आयर्लंडने नाणेफेक जिंकली

आयर्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही कर्णधारांनी आपल्या संघात कोणताही बदल केलेला नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com