इरफान म्हणाला, मलाही काश्मीर सोडायला लावले!

वृत्तसंस्था
रविवार, 4 ऑगस्ट 2019

शिबिर 14 जुलैपर्यंत चालणार होते. मात्र, आता सर्व खेळाडू तातडीने घरी गेले असून, पुन्हा 25 जुलैस एकत्र येतील, असे इरफानने म्हटले आहे.

श्रीनगर : दहशतवादी हल्ल्याच्या शक्‍यतेमुळे येथे सुरू असलेला जम्मू-काश्‍मीर क्रिकेट संघाचे शिबिरही तातडीने बंद करण्यास सांगण्यात आले आहे. संघाचा प्रशिक्षक इरफान पठाण याने ट्विटरवरून ही माहिती दिली.

'माझ्यासह साधारण शंभर क्रिकेटपटूंना तातडीने शिबिर सोडून जाण्यास सांगण्यात आले आहे,' असे ट्विट इरफानने केले आहे. जम्मू-काश्‍मीर व्यवस्थापनाने याच कारणाने यापूर्वी अमरनाथ यात्राही आटोपती घेण्याचे आदेश यात्रेकरूंना दिले होते.

शिबिर 14 जुलैपर्यंत चालणार होते. मात्र, आता सर्व खेळाडू तातडीने घरी गेले असून, पुन्हा 25 जुलैस एकत्र येतील, असे इरफानने म्हटले आहे.

या ट्विटला रिट्विट करत इरफानला अनेक नेटकऱ्यांनी लक्ष्य बनवले. काही जणांनी काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे, त्यामुळे काश्मीरमध्ये ज्या काही हालचाली सुरू आहेत, त्या देशहिताच्या आहेत, असे म्हटले आहे. तर काहींनी इरफानला तू तुझी जिहादी मानसिकता दाखविली, असे म्हटले आहे. 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Irfan Pathan and other Jammu Kashmir cricketers asked to leave Kashmir