
इरफान पठाणने अमित मिश्राच्या 'संविधान' ट्विटवर दिली प्रतिक्रिया
भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण (Irfan Pathan) आणि लेग स्पिनर अमित मिश्रा (Amit Mishra) यांच्यात गेल्या काही दिवसांपासून ट्विटरवर शाब्दिक 'देवाण-घेवाण' सुरू आहे. इराफान पठाणने आपल्या देश भारताविषयी एक ट्विट केले होते. हे ट्विट दिल्लीतील गहांगीरपुरीमध्ये झालेल्या दंगलीच्या पार्श्वभुमीवर होते असा अनकांनी अर्ध काढला. त्यावर इरफानच्या ट्विटचाच आधार घेत अमित मिश्राने भारताचे संविधान (Indian Constitution) फॉलो करा असे ट्विट केले होते. नेटकऱ्यांनी हे इरफान पठाणच्या ट्विटला प्रत्युत्तर असल्याचा अर्थ काढला होता. दरम्यान, इराफान पठाणने अमित मिश्राच्या ट्विटचा आधार घेत ट्विट करून प्रत्युत्तर दिले.
हेही वाचा: हसन अलीचा 'यॉर्कर' अन् स्टंपचे जाग्यावर दोन तुकडे; पाहा Video
गेल्या आठवड्यात इरफान पठाणने एक गुढ ट्विट केले होते. या ट्विटमध्ये त्याने 'माझा देश, माझा सुंदर देश, ज्याच्यामध्ये जगातील सर्वात चांगला देश होण्याची क्षमता आहे. मात्र...' असा क्रिप्टिक मेसेज दिला होता. इराफान पठाणने जहांगीरपुरीमधील घटनेचा कोणताही उल्लेख आपल्या ट्विटमध्ये केला नसला तरी त्याचा रोख त्याच घटनेकडे असल्याचे अनेक नेटकऱ्यांना वाटते.
हेही वाचा: IPL Play Off | BCCI अध्यक्ष, सचिवांनी 'प्ले ऑफ' घेतले अर्धे-अर्धे वाटून
इरफानच्या या ट्विटवर भारताचा लेगस्पिनर अमित मिश्राने ट्विट करत प्रतिक्रिया दिली होती. त्याने इराफानचेच अधुरे ट्विट पूर्ण करत भारताच्या संविधानाला फॉलो करण्याचा सल्ला दिला होता. त्याने ट्विट केले होते की, 'माझा देश, माझा सुंदर देश, ज्याच्याकडे जगातील सर्वात चांगला देश होण्याची क्षमता आहे. फक्त लोकांना आपण सर्वात प्रथम संविधानाला फॉलो करावे लागेल हे समजायला हवे.'
यावर आता इराफान पठाणने भारतीय संविधानच्या प्रास्ताविकेचा फोटो शेअर करत ट्विट केले की, 'मी कायम संविधानाला फॉलो केले आहे. आणि या सुंदर देशातील प्रत्येक नागरिकाला संविधान फॉलो करण्याची विनंती करत आहे. हे वाचा आणि परत परत वाचा.'
Web Title: Irfan Pathan Reply To Amit Mishra Follow Indian Constitution Tweet
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..