हसन अलीचा 'यॉर्कर' अन् स्टंपचे जाग्यावर दोन तुकडे; पाहा Video | Hasan Ali Breaks Middle Stumps | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

hasan ali breaks middle stumps

हसन अलीचा 'यॉर्कर' अन् स्टंपचे जाग्यावर दोन तुकडे; पाहा Video

Hasan Ali Yorker: पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अलीने काउंटी चॅम्पियनशिपमध्ये उत्कृष्ट सुरुवात केली आहे. तुफानी गोलंदाजाने आपल्या अचूक यॉर्करने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. हसन अली इंग्लंडमधील काउंटी डिव्हिजन सामन्यात लँकेशायरकडून खेळत आहे. ग्लॉस्टरशायरविरुद्धच्या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी त्याने अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनसह नवीन चेंडूने गोलंदाजीची सुरुवात केली. यादरम्यान त्याने अचूक यॉर्कर टाकत स्टंपचे तुकडे केले, ज्याची सर्वत्र चर्चा होत आहे.(Hasan Ali Breaks Middle Stumps)

हेही वाचा: IPL चे प्लेऑफ वेळापत्रक जाहीर; कुठे असेल फायनल घ्या जाणून?

हसन अलीने (hasan ali) डावाच्या 25व्या षटकातील शेवटचा चेंडू स्टंपजवळून टाकला. यष्टिरक्षक फलंदाज जेम्स ब्रॅसी क्रीजवर होता. ग्लॉस्टरशायरच्या यष्टीरक्षकाने हसनचा हा यॉर्कर बचावात्मक पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला पण त्यात तो यशस्वी होऊ शकला नाही. चेंडू थेट विकेटमध्ये गेला. चेंडूचा वेग इतका वेगवान होता की मधला स्टंप दोन तुकडे झाला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर हसन अलीने पहिल्या डावात 17 षटके टाकली. यादरम्यान त्याने 47 धावा देत 6 षटकांची मेडन फेकली आणि एकूण 6 विकेट्स आपल्या नावावर केल्या. यावेळी हुस उत्कृष्ट लयीत दिसत आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून त्याच्या फॉर्मबाबत चिंता होती. तो विकेटसाठी झगडताना दिसला, पण तो कौंटीमध्ये ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय, तो भविष्यात पाकिस्तानसाठी फायदेशीर ठरू शकतो.

हेही वाचा: IPL 2022: स्टँडमध्येच नाचायला लागली हार्दिक पांड्याची पत्नी; पाहा Video

27 वर्षीय हसन अलीने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला शानदार सुरुवात केली. पण २०२१ च्या टी२० विश्वचषकातील त्याच्या फॉर्मबद्दल चिंता व्यक्त केली जात होती. विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्धचा झेल सोडल्यानंतर त्याच्यावर जोरदार टीका झाली होती. या झेलचा फटका पाकिस्तानला सामना गमवावा लागला. हसनने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते की, तो झेल सोडल्यानंतर तो दोन दिवस झोपू शकला नाही आणि रात्री त्याला भयानक स्वप्ने पडू होते.

Web Title: Hasan Ali Breaks Middle Stumps With Perfect Yorker County Championship Cricket Watch Video

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top