World Cup 2019 : इंग्लंड यापूर्वीही वर्ल्डकप जिंकलाय कळलं ना? माजी खेळाडूचा राग अनावर

वृत्तसंस्था
Sunday, 14 July 2019

इंग्लंडला पहिल्यांदाच विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा विजेतेपद जिंकण्याची संधी 14 जुलैला आहे असे म्हणू नका, फार तर इंग्लंडच्या पुरुष क्रिकेट संघास प्रथमच ही संधी आहे असे म्हणू शकता असे इंग्लंडची माजी क्रिकेटपटू इशा गुहाने सुनावले आहे. 

वर्ल्ड कप 2019 : लंडन : इंग्लंडला पहिल्यांदाच विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा विजेतेपद जिंकण्याची संधी 14 जुलैला आहे असे म्हणू नका, फार तर इंग्लंडच्या पुरुष क्रिकेट संघास प्रथमच ही संधी आहे असे म्हणू शकता असे इंग्लंडची माजी क्रिकेटपटू इशा गुहाने सुनावले आहे. 

इशा गुहाने शनिवारी केलेले याबाबतचे ट्‌वीट चांगलेच व्हायरल झाले आहे. तिने पत्रकारांची कानऊघाडणीच केली आहे. इंग्लंडने महिला विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा यापूर्वी जिंकली आहे, त्यामुळे इंग्लंडच्या पुरुष संघाने यापूर्वी कधीही विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा जिंकलेली नाही असे म्हणू शकता, असे तिने म्हंटले आहे. इंग्लंडने चारदा ही स्पर्धा जिंकली आहे, त्यातील 2009 च्या संघात इशाचा समावेश होता. 

इशाच्या म्हणण्यात नक्कीच तथ्य आहे. इंग्लंडच्या महिला संघाने 1973, 1993, 2009 आणि 2017 च्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत बाजी मारली आहे. विश्वकरंडक महिला क्रिकेट स्पर्धा केवळ इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडनेच जिंकली आहे. मात्र पुरुष तसेच महिलांच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत एकाचवेळी विजेते असण्याचा मान यापूर्वी ऑस्ट्रेलियालाच लाभला आहे, आता ही संधी इंग्लंडला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Isha Guha gets angry on Journalists