
Ishan Kishan : वा रे इशान! पहिलीच संधी अन् द्विशतकी खेळी, रचला इतिहास
Ishan Kishan IND vs BAN : सलामीवीर इशान किशनने बांगलादेशविरुद्ध इतिहास रचला आहे. शेवटच्या वनडेत त्याने द्विशतक झळकावले आहे. हा पराक्रम करणारा तो जगातील सातवा आणि भारतातील चौथा फलंदाज ठरला आहे.
इशान किशनने 50 चेंडूत अर्धशतक, 85 चेंडूत शतक, 103 चेंडूत 150 धावा केल्यानंतर या सलामीवीराने 126 चेंडूत द्विशतक पूर्ण केले. इशान 131 चेंडूत 210 धावा करून बाद झाला. यादरम्यान त्यांने 23 चौकार आणि 9 षटकार मारले. यापूर्वी माजी दिग्गज सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा आणि वीरेंद्र सेहवाग यांनी भारताकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतके झळकावली आहेत.
विश्वविक्रम मोडून रचला इतिहास
इशान किशनने 126 चेंडूत एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावून वेस्ट इंडिजचा फलंदाज ख्रिस गेलचा विश्वविक्रम मोडला आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 138 चेंडूत द्विशतक झळकावण्याचा विश्वविक्रम वेस्ट इंडिजचा फलंदाज ख्रिस गेलच्या नावावर होता, मात्र आता इशान किशनने त्याचा विश्वविक्रम मोडून इतिहास रचला आहे.
एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणाऱ्या फलंदाजांची संपूर्ण यादी
रोहित शर्मा - 264
मार्टिन गुप्टिल - 237*
वीरेंद्र सेहवाग - 219
ख्रिस गेल - 215
फखर जमान - 210*
इशान किशन - 210
रोहित शर्मा - 209
रोहित शर्मा - 208*
सचिन तेंडुलकर - 200*