Ishan Kishan
Ishan Kishanesakal

Ishan Kishan : द्रविडचा सल्ला धुडकावणारा इशान किशन रिलायन्स स्टेडियमवर काय करतोय?

Ishan Kishan Rahul Dravid : रोहितच्या पठ्ठ्या हार्दिकच्या गोटात? बडोद्याच्या रिलायन्स स्टेडियममध्ये करतोय सराव

Ishan Kishan Rahul Dravid : इशान किशन हा गेल्या अनेक आठवड्यापासून क्रिकेटच्या मैदानावरून गायब आहे. दरम्यान, इंग्लंडविरूद्धच्या दोन कसोटीत केएस भरतने सुमार कामगिरी केल्यानंतर इशान किशनची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली होती. त्यावेळी राहुल द्रविडने इशान किशनला देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचा सल्ला दिला होता. त्याशिवाय त्याची भारतीय संघात निवड होणार नाही असे स्पष्ट संकेत दिले होते.

मात्र इशान किशनने रणजी ट्रॉफीतील सामने न खेळता एक वेगळाच निर्णय घेतला. त्याने बडोदा येथील रिलायन्स स्टेडियमवरील किरण मोरे क्रिकेट अकॅडमीत सराव करण्याचा निर्णय घेतला आहे. क्रिकबझने दिलेल्या माहितीनुसार इशान किशन हा गेल्या काही आठवड्यापासून बडोदा येथे आहे. तो किरण मोरे अकॅडमीत सराव करत आहे.

Ishan Kishan
Disney's Sports : भारतातील वर्ल्डकपचे स्ट्रिमिंग करूनही डिज्नेला झाला 2613 कोटी रूपयांचा तोटा?

इशान किशन हा पांड्या बंधू हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्यासोबत सराव करतोय. हार्दिक पांड्या हा आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करणार आहे. किरण मोरे यांनी इशान किशन त्यांच्या अकॅडमीत सराव करतोय या वृत्ताला दुजोरा दिला. झारखंडचा हा 25 वर्षाचा खेळाडू किरण मोरेंच्या मार्गदर्शनाखाली सराव करतोय. मोरेंनी यापेक्षा अधिक माहिती देण्याचं टाळलं.

इशान किशन नोव्हेंबर 2023 पासून भारतीय संघापासून दूर आहे. राहुल द्रविडने इशान किशनला देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचा सल्ला दिला होता. हा सल्ला इशान किशनने मनावर घेतला नसल्याचे जाणवते.

Ishan Kishan
Team India Squad vs Eng : टीम इंडियाच्या 'स्क्वाड'बाबत मोठी अपडेट! 3 दिग्गजांचे पुनरागमन, 2 खेळाडूंचा पत्ता कट?

इशान किशन जर जास्तकाळ भारतीय संघापासून दूर राहिला तर त्याचा परिणाम हे त्याच्या केंद्रीय करारावर होणार आहे. इशान किशन सध्या ग्रेड C करारात मोडतो. त्याला वर्षाला 1 कोटी रूपये मिळतात. तो देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय सामने खेळत नसल्याने बीसीसीआय त्याच्या कराराबाबत विचार करण्याची देखील शक्यता आहे.

इशान किशनच्या भविष्याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मार्चमध्ये होणाऱ्या आयपीएल हंगामाद्वारेच इशान किशन क्रिकेटच्या मैदानावर परतण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

(Sports Latest News)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com