IND vs NZ : 131 चेंडूत 210 धावा ठोकणारा फलंदाज पहिल्या सामन्यात खेळणार मात्र... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

India Vs New Zealand 1st ODI Ishan Kishan

IND vs NZ : 131 चेंडूत 210 धावा ठोकणारा फलंदाज पहिल्या सामन्यात खेळणार मात्र...

India Vs New Zealand 1st ODI Ishan Kishan : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला वनडे सामना उद्या (दि. 18) हैदराबाद येथे खेळला जाणार आहे. मात्र पहिल्या सामन्यापूर्वीच भारतीय संघातील मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेतूनच बाहेर गेला.

भारताला अय्यरच्या रूपात धक्का बसला असला तरी हा धक्का बांगलादेशविरूद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात 131 चेंडूत 210 धावांची खेळी करणाऱ्या इशान किशनच्या पथ्यावर पडणार आहे. त्याला न्यूझीलंडविरूद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात खेळण्याची संधी मिळणार आहे. कर्णधार रोहित शर्माने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

हेही वाचा: ICC Test Ranking : ये क्या हुआ कैसे हुआ... ICC नं वेबसाईवर घातला गोंधळ अन् ऑस्ट्रेलिया झाली रागानं लाल

रोहित म्हणाला की, 'इशान किशन मधल्या फळीत फलंदाजी करेल. मला आनंद आहे की बांगलादेशविरूद्धच्या धडाकेबाज खेळीनंतर त्याला संघात खेण्याची संधी मिळाली आहे.' इशान किशनला संघात स्थान मिळाले आहे. मात्र त्याला सलामीला नाही तर मधल्या फळीत फलंदाजी करावी लागणार आहे.

इशान किशनने आतापर्यंत भारताकडून 10 वनडे सामने खेळले आहेत. या 10 वनडे सामन्यात त्याने एकदाही चौथ्या क्रमांकाच्या खाली फलंदाजी केलेली नाही. त्याने दोनवेळा सलामी, चारवेळा तिसऱ्या आणि तिनवेळा चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे.

केएल राहुल पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करतोय. त्यामुळे इशान किशन उद्याच्या सामन्यात पहिल्यांदाच पाचव्या क्रमकांवर फलंदाजीला उतरू शकतो.

हेही वाचा: IND vs NZ : हार्दिक पांड्या वनडेचा 'पर्मनंट' कॅप्टन होऊ शकत नाही कारण...

राहुलच्या अनुपस्थितीत करणार विकेटकिपिंग

श्रीलंकेविरूद्धच्या तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत केएल राहुल विकेटकिपिंग करत होता. मात्र अथिया शेट्टीसोबत केएल राहुल विवाहबंधनात अडकणार आहे. त्यामुळेच त्याने न्यूझीलंडविरूद्धच्या वनडे मालिकेतून ब्रेक घेतला आहे. प्लेईंग 11 मध्ये जागा मिळालेला इशान किशन मधल्या फळीत फलंदाज म्हणून आणि विकेटकिपर म्हणून देखील जबाबदारी सांभाळणार आहे.

(Sports Latest News)

हेही वाचा : भारतीयांनी जगाला डिजिटल पेमेंट शिकवायची आलीये वेळ...