ISSF World Cup : अनिश भानवालाने 12 वर्षाचा दुष्काळ संपवला; भारताला जिंकून दिले पदक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ISSF World Cup

ISSF World Cup : अनिश भानवालाने 12 वर्षाचा दुष्काळ संपवला; भारताला जिंकून दिले पदक

ISSF World Cup : आयएसएसएफ वर्ल्डकप शूटिंग स्पर्धेत भारताच्या अनिश भानवालाने 12 वर्षाचा दुष्काळ संपवला. अनिशने 25 मीटर रॅपिड फायर पिस्तुल प्रकारात कांस्य पदक पटकावले. रॅपिड फायर पिस्तुल प्रकारात यापूर्वी भारताला विजय कुमारने पदक जिंकून दिले होते. या गोष्टीला एक तप म्हणजे 12 वर्षे उलटून गेली आहेत.

यानंतर आता कैरो येथे सुरू असलेल्या ISSF World Cup स्पर्धेत अनिशने शेवटच्या दिवशी पुरूषांच्या 25 मीटर रॅपिड फायर पिस्तुल प्रकारात कांस्य पदक जिंकले. त्यामुळे या प्रकारातील 12 वर्षाचा पदकाचा दुष्काळ संपुष्टात आला. अनिशचे हे पहिले वरिष्ठ स्तरावरील वर्ल्डकपमधील पहिले पदक आहे. या पदकासाठी अनिशला फार कष्ट करावे लागले.

या प्रकारात इतालवी मॅसिमो स्पिनेलाने अंतिम फेरीत 32 हिटसह सुवर्णपदक जिंकले. त्याने वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील रौप्य पदक विजेत्या फ्रान्सच्या क्लेमेंट बेसागुएटला मागे टाकले. तो 40 शॉट्सनंतर दोन हिटने मागे पडला. तर अनिशने 30 शॉट्समधील 21 हिट मिळवत तिसरे स्थान पटकावले. त्याने रिओ ऑलिम्पिक चॅम्पियन ख्रिस्तियन रेइट्सला पराभूत केले. त्याने 20 शॉट्समध्ये 13 हिट मिळवले होते.

अनिशने विजयानंतर सांगितले की, 'मी सामन्यावेळी स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करत होतो. याचा फायदा झाला. राष्ट्रीय सराव सत्रात आम्हाला दबावात स्वतःला कसे नियंत्रित ठेवता येईल याचे ट्रेनिंग मिळाले. आजच्या सामन्यात चौथी सिरीज अवघड होती. मला माजी ऑलिम्पिक पदक विजेत्याला हरवायचं आहे. मी स्वतःला ही सिरीज माझे स्वप्न साकार करू शकते असे समजावले. यानंतर मी यशस्वी ठरलो.'

(Sports Latest News)

हेही वाचा : जाणून घ्या कॉन्ट्रा फंडातल्या गुंतवणुकीबाबत

टॅग्स :sports