नॉन स्ट्रायकर रन आऊट करणाऱ्या गोलंदाजांची बदनामी करणाऱ्यांना MCC ची सणसणीत चपराक | MCC Non Striker Run Out | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MCC Non Striker Run Out

MCC : नॉन स्ट्रायकर रन आऊट करणाऱ्या गोलंदाजांची बदनामी करणाऱ्यांना MCC ची सणसणीत चपराक

MCC Non Striker Run Out : क्रिकेटचे नियम तयार करण्याचे पालकत्व असलेली संघटना एमसीसीच्या जागतिक क्रिकेट समितीने नॉन स्ट्रायकर रन आऊट नियमाबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. MCC ला हा नियम सर्व वयोगटातील क्रिकेटमध्ये गोलंदाजांनी सामन्य पद्धतीने वापरावा अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे जे या नियामच्या नावाने गळा काढत होते त्यांना एक स्पष्ट संदेश गेला आहे.

यापूर्वी मंकडिंग या नावाने ओळखल्या जाणाऱ्या नियमामध्ये काही बदल करत नवा नॉन स्ट्रायकर रन आऊट नियम नुकताच जागतिक क्रिकेटमध्ये लागू करण्यात आला आहे. मात्र आधी एमसीसीने आणि नंतर आयसीसीने या नियमाला वैधतेचे स्वरूप दिले तरी काही क्रिकेटपटू यावर टीका करत होते. मात्र भारताचा आर अश्विन या नियमाबाबत आग्रही होता.

आता एमसीसीने एक पाऊल पुढे जात हा नियम सर्व वयोगटातील क्रिकेट स्पर्धांमध्ये सहजरित्या वापरण्यात यावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. याबाबत नुकतीच दुबईत आयसीसी कार्यालयात बैठक झाली होती.

एमसीसीने आपल्या वक्तव्यात, 'नॉन स्ट्रायकर रन आऊट बाय बॉलर या नियमाबाबतचे वाद आणि संभ्रम संपवण्याचा एक सोपा मार्ग आहे. नॉन स्ट्रायकर फलंदाज हा नियमाला बांधील आहे. जोपर्यंत चेंडू गोलंदाजाच्या हातातून सुटत नाही तोपर्यंत फलंदाजाला क्रिज सोडता येणार नाही.'

'गोलंदाजाला या नियमाचा वापर करून फलंदाजाला बाद केल्यानंतर बदनामीला सामोरे जावे लागते. यावर दुबईतील बैठकीत चर्चा झाली. यावेळी समितीमधील सर्व सदस्यांनी एकमुखाने नॉन स्ट्रायकर फलंदाजाने आधीच क्रीज सोडणे हा नियम भंग करण्याचा प्रकार आहे. त्यामुळे तो दोषी असेल.'

एमसीसी आपल्या वक्तव्यात पुढे म्हणते की, 'गोलंदाजाने नॉन स्ट्रायकर फलंदाजाला रन आऊट करण्याआधी वॉर्निंग द्यावी असा कोणताही नियम नाही. गोलंदाजाने वॉर्निंग न देता फलंदाजाला बाद करणे हे पूर्णपणे नियमाला धरून आहे.'

(Sports Latest News)

हेही वाचा : जाणून घ्या कॉन्ट्रा फंडातल्या गुंतवणुकीबाबत