Shahid Afridi : शोएब अख्तर अन् मोहम्मद शमीच्या बाऊन्सर भांडणात आफ्रिदीने घेतली उडी, म्हणतो... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shahid Afridi : शोएब अख्तर अन् मोहम्मद शमीच्या बाऊन्सर भांडणात आफ्रिदीने घेतली उडी, म्हणतो...

Shahid Afridi : शोएब अख्तर अन् मोहम्मद शमीच्या बाऊन्सर भांडणात आफ्रिदीने घेतली उडी, म्हणतो...

Mohammed Shami and Shoaib Akhtar Tweet : टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानच्या पराभवानंतर माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरला मोहम्मद शमीने ट्विटरवर ट्रोल केले. त्यानंतर समालोचक हर्षा भोगले यांची टिप्पणी शेअर करत अख्तरने शमीला प्रत्युत्तर दिले. आता या प्रकरणात पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीचीही एंट्री केली आहे.

हेही वाचा: Ben Stokes : "शर्यत अजून संपली नाही..." ICC ने शेअर केला स्टोक्सचा खास व्हिडिओ

शमी-अख्तरमधील संपूर्ण प्रकरण -

पराभवानंतर शोएब अख्तरने ट्विटरवर हार्ट ब्रेक इमोजी शेअर केला आहे. त्याचे ट्विट रिट्विट करत शमीने लिहिले की, माफ करा भाऊ! यालाच कर्म म्हणतात. काही तासांतच शमीच्या या उत्तराला लाखो सोशल मीडिया यूजर्सनी पसंती दिली आणि अनेकांनी त्यावर कमेंट केल्या. त्यानंतर अख्तरने हर्षा भोगले यांचे एक विधान शेअर केले. यामध्ये हर्षाने पाकिस्तानी संघाचे कौतुक केले आहे. अख्तरने लिहिले, याला समजूतदार ट्विट म्हणतात.

हेही वाचा: Ben Stokes : "शर्यत अजून संपली नाही..." ICC ने शेअर केला स्टोक्सचा खास व्हिडिओ

मोहम्मद शमीचे उत्तर पाकिस्तानचे चाहते आणि आफ्रिदीसह देशातील माजी क्रिकेटपटूंना चांगलेच झोंबले. पाकिस्तानी वृत्तवाहिनीवर आफ्रिदीला याबाबत विचारले असता. आफ्रिदी म्हणतो, माजी आणि सध्याच्या क्रिकेटपटूंनी अशा प्रकारची टिप्पणी करण्यापासून स्वतःला परावृत्त केले पाहिजे. आपण या सर्व गोष्टी संपवल्या पाहिजेत आणि द्वेष वाढवला नाही पाहिजे. आपण असे केले तर सामान्य माणसाकडून काय अपेक्षा ठेवायची. खेळामुळे आपले नाते सुधारू शकते. आम्हाला त्यांच्यासोबत खेळायचे आहे. म्हणून अशा गोष्टी करू नयेत.

2022 च्या टी-20 विश्वचषक फायनलबद्दल बोलायचे तर, मेलबर्नमध्ये रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा पाच गडी राखून पराभव केला. इंग्लंडच्या विजयाचा हिरो ठरला अष्टपैलू बेन स्टोक्स, ज्याने 52 धावांची शानदार खेळी केली.