इंग्लंडला धक्का; अँडरसन दुसऱ्या कसोटीस मुकणार 

वृत्तसंस्था
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

ऍशेस मालिकेतील दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यास इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन मुकणार आहे. उजव्या पायाची पोटरी दुखावल्यामुळे तो पहिल्या कसोटीतही गोलंदाजी करू शकला नव्हता.

बर्मिंगहॅम : ऍशेस मालिकेतील दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यास इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन मुकणार आहे. उजव्या पायाची पोटरी दुखावल्यामुळे तो पहिल्या कसोटीतही गोलंदाजी करू शकला नव्हता.

अँडरसन आता इंग्लंड आणि लॅंकेशायर संघाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसह पुनर्वसन कार्यक्रमात सहभागी होईल. दुसरी कसोटी 14 ऑगस्टपासून लॉर्डसवर सुरू होणार आहे. त्यानंतरही एकूण तंदुरुस्तीवर त्याचा सहभाग अवलंबून राहणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: James Anderson ruled out of 2nd test in Ashes 2019